श्री संतकृपा अभियांत्रिकी महाविद्यालयातील १८ विद्यार्थ्यांची विविध बहुराष्ट्रीय कंपनीत निवड.


निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी व ट्रेनिंग आणि प्लेसमेंट कक्षातील स्टाफ.

कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
घोगांव ता. कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या श्री संतकृपा अभियांत्रिकी महाविद्यालयातील १८ विद्यार्थ्यांची विविध बहुराष्ट्रीय कंपनीत निवड झाली आहे. श्री संतकृपा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट कक्षाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या मुलाखतीची आणि यादरम्यान घेतल्या जाणाऱ्या विविध क्षमता चाचण्यांची तयारी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती.

मेकॅनिकल डिपार्टमेंट मधून शुभम थोरात, तेजस चव्हाण व अभिजित डाळे या विद्यार्थ्यांची BAJAJ AUTO Ltd , Vivo, Hisoa Electronic Pvt.Ltd , John deere या बहुराष्ट्रीय कंपनीत निवड झाली आहे .

तर इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट मधून अश्विनी थोरात,प्रतिक शिर्के, रोहित जाधव या विद्यार्थ्यांची Astech Enterprises, Omi Electro Mechanicals , Trainee engg Mecc Alte या कंपनीत निवड झाली आहे.

सिव्हिल डिपार्टमेंट मधून कोमल ताटे, सुप्रिया जाधव, विश्वराज देशमुख, विवेक शिंदे, सोहेल शेख, प्रथमेश थोरात, शुभम पाटील, नकुल पाटील, संकेत कदम,आकाश सोनवले व तेजश्री कदम या विद्यार्थ्यांची G A Bhilare Consultancy, KJ infrastructure pvt. Ltd. , Anand Patil Engg. services, Ashok group, knest Aluform Pune, Dimension construction, KOLBRO Nagpur, Skaf Developers, Square Yards, Vtp Realty अश्या विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

यावेळी श्री संतकृपा अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी म्हणाले की कोरोना संकट काळातही श्री संतकृपा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ट्रेनिंग आणि प्लेसमेंट कक्षाने नवनवीन कल्पना राबवून विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी ऑनलाईन मार्गदर्शन केले होते. तसेच विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळवून देण्यासाठी ट्रेनिंग आणि प्लेसमेंट कक्षातील स्टाफ सदैव प्रयत्नशील असतो.

अमितकुमार जगदाळे, अतुल कोळेकर, संदीप पाटील, भाग्यश्री पाटील व ट्रेनिंग आणि प्लेसमेंट कक्षातील इतर स्टाफने विशेष परिश्रम घेतले.

विविध कंपन्यांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे चेअरमन शशिकांत पाटील, उपाध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, ट्रस्टी प्राजक्ता जोहरी व श्री संतकृपा अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी केले.