तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
तळमावले येथील राजे संघर्ष प्रतिष्ठान च्या वतीने आज "माणुसकीची" दिवाळी साजरी करत ढेबेवाडी पोलीस ठाण्यांर्गत सर्व पोलीस कर्मचारी यांना दिवाळी सणानिमित्त मिठाई भेट देण्यात आली .
राजेसंघर्ष प्रतिष्ठान चे सर्वेसर्वा श्री योगेश पाटणकर साहेब यांच्या प्रतिष्ठान च्या माध्यमातून आजवर तळागाळातील लोकांच्यासाठी सामाजिक प्रयत्नातून कामे केली आहेत व लोकांच्या पर्यंत राजेसंघर्ष प्रतिष्ठान ची एक सामाजिक बांधिलकी निर्माण झाली असून याच पार्श्वभूमीवर ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या माध्यमातून आजवर कोरोना सारखी महाभयंकर बिमारी असो व पावसाळ्या मध्ये पूरग्रस्तांना केलेली मदत सतत पोलीस हा स्वतःला ह्या जबाबदारी मध्ये वाहून घेत आहे या साठी ढेबेवाडी पोलीस ठाण्याला थोडा आधार मिळावा या साठी राजेसंघर्ष प्रतिष्ठान च्या माध्यमातून दिवाळी उत्सव साजरा केला.
पोलीस नेहमीच नागरिकांची दिवाळी सुखात जावी, सणवार चांगले जावे, वाहतूकीला शिस्त रहावी हीच नेहमी पोलिसांची वर्षोनुवर्षे दिवाळी असून व पोलीस नेहमीच प्रयत्न करत असतात.
या वेळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संतोष पवार, राजेसंघर्ष प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष मा. योगेश पाटणकर, खजिनदार व करपेवाडी गावचे सरपंच रमेश नावडकर ,संजय गुरव व सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.