चिमुरड्या ‘स्पंदन’ ने जपला मतिमंद विद्यार्थ्यांप्रती जिव्हाळा

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

जुळेवाडी (ता.कराड) येथील श्री बालाजी मतिमंद मुलांच्या निवासी शाळेस चि.स्पंदन रेश्मा संदीप डाकवे याने ‘ज्ञानाची शिदोरी’ देवून या विद्यार्थ्यांप्रती जिव्हाळा जपण्याचे काम केले आहे. याप्रसंगी डॉ.संदीप डाकवे, सौ.रेश्मा डाकवे, चि.स्पंदन डाकवे, इलाही मुल्ला व इतर मान्यवर उपस्थित होते. कोरोनाच्या व महाराष्ट्रातील पुरपरिस्थतीच्या पार्श्वभूमीवर स्पंदनचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केला गेला. यादिवशी स्पंदनच्या छोट्या बालमित्रांनी दिलेले शैक्षणिक साहित्य आणि डाकवे परिवाराकडून काही साहित्य विद्यार्थ्यांना दिले आहे.

‘‘वाढदिवस आपल्या स्पंदनचा, संदेश सामाजिक बांधिलकीचा’’ अशा आशयातून स्पंदनचा प्रत्येक वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प डाकवे परिवाराने केला आहे. याच संकल्पनेतून यावर्षी स्पंदनच्या वाढदिवसानिमित्त जुळेवाडी येथील मतिमंद मुलांच्या शाळेस शैक्षणिक साहित्य दिले आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व मुले आपापल्या घरी आहेत. परंतू दिवाळी नंतर शाळा सुरु होण्याचे संकेत आहे. यावेळी शैक्षणिक साहित्याअभावी मुलांची हेळसांड होवू नये यासाठी हे साहित्य दिले आहे.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण माने, सचिव राजाराम माने यांना मुख्याध्यापिका विद्या पवार, अक्षय पाटील, विनोद माने, सागर देवकांत, सुशीला पवार, पौर्णिमा कांबळे, बंडू माळी व अन्य सहकारी यांचे सहकार्य लाभते.

समाजात एकाद्या विचाराने प्रेरित होवून उपक्रम सुरु करणारे आरंभशूर भरपूर असतात. पण डॉ.संदीप डाकवे ठरवलेली प्रत्येक गोष्ट तडीस नेतात.

स्पंदनच्या प्रथम वाढदिवसादिवशी भेटवस्तूऐवजी जमा झालेली रक्कम रु.35,000/- ‘नाम’ फाऊंडेशनला दिली आहे. दुसऱ्या वाढदिवसाला रु.5,000/- आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीजला जमा केले आहेत. तिसऱ्या वाढदिवसाला स्पंदनची ग्रंथतुला करुन जमलेली रु.11,000/- ची सर्व पुस्तके जि.प. शाळेला दिली आहेत. चौथ्या वाढदिवसाला दिव्यांग मुलांना चित्रकलेचे साहित्य दिले आहे. पाचव्या वाढदिवसाला शांताई फाऊंडेशन ला रु.5,000/- किमतीचे जीवनावश्यक वस्तू दिल्या आहेत. सहाव्या वाढदिवसानिमित्त रु.6,000/- गरजू विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरली आहे. अशाप्रकारे चि.स्पंदनचा प्रत्येक वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत एका वेगळया उपक्रमाने साजरा केला जातो.

स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात चांगले योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. इ. उपक्रमातून गरजू, होतकरु विद्यार्थ्यांना मदत केली आहे.

यापूर्वीही स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत वह्या वाटप, स्कूल बॅग-संगणकासाठी आर्थिक सहकार्य, एक वही-एक पेन, माणूसकीच्या वह्याा, ज्ञानाची शिदोरी, तक्ते वाटप, गणवेष वाटप, प्राथ. शाळा डाकेवाडी आणि  कराड नगरपरिषद अंगणवाडी रंगकाम व बोलक्या भिंती, कुठरे-जांभूळवाडी शाळेला प्रतिमा वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा घरी जावून सत्कार, 3 री विद्यार्थी स्वााध्याय माला वितरण, सॅल्युट कार्ड स्पर्धा, किल्ले बनवा स्पर्धा, ग्रंथालयांना दिवाळी अंक वितरण, मान्यवरांचे स्वागत पुस्तके देवून असे शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत. त्या माध्यमातून सुमारे 180 पेक्षा जास्त मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाली आहे. या उपक्रमांचे समाजाच्या सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

सामाजिक जबाबदारीचे भान ओळखत डॉ.संदीप डाकवे यांनी राबवलेले उपक्रम नक्कीच अभिनंदनीय आहेत. या उपक्रमाला शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अ‍ॅड. जनार्दन बोत्रे, प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे, बाळासाहेब कचरे, प्रा. ए.बी.कणसे, वडील राजाराम डाकवे, आई सौ.गयाबाई डाकवे, पत्नी सौ. रेश्मा डाकवे, भरत डाकवे, आप्पासोा निवडूंगे तसेच स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभते.

सातव्या वाढदिवसाचे औचित्य साधून चि.स्पंदन रेश्मा संदीप डाकवे याने ‘ज्ञानाची शिदोरी’ मधून शैक्षणिक साहित्य देवून मतिमंद विद्यार्थ्यांप्रती जिव्हाळा जपला आहे. त्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

__________________________________

शासनाचे कोणतेही अनुदान नसलेल्या श्री बालाजी मतिमंद मुलांच्या शाळेस समाजातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक अथवा वस्तू स्वरुपात मदत करायला हवी. स्पंदनच्या वाढदिवसानिमित्त ‘ज्ञानाची शिदोरी’ या उपक्रमांतर्गत ‘फुल ना फुलाची पाकळी’ देण्याचा प्रयत्न केला आहे. असे मत स्पंदनचे वडील डॉ.संदीप डाकवे यांनी केले आहे. 

__________________________________