धार्मिक विधी पार पाडत कुंभारगाव येथील देवीचा पाकळणी भंडारा संपन्न.

कुंभारगाव|कृष्णाकाठ वृत्तसेवा :                         
कुंभारगाव ता पाटण येथील श्री लक्ष्मी अंबाबाई देवीची यात्रा त्रिपुरारी पौर्णिमा शुक्रवार दि 19/11/2021 रोजी धार्मिक विधी पार पाडून संपन्न झाली. या यात्रेचा श्री लक्ष्मी अंबाबाई देवीचा पाकाळनीचा भंडारा शुक्रवार दि, 26/11/2021 रोजी सायंकाळी उत्साहात संपन्न झाला.यावेळी श्रीलक्ष्मीी देवीची पालखीतून मिरवणूक मंदीरा भोवती 5 प्रदिक्षणा काढून करण्यात आली. देवीच्या भंडाऱ्याचा उत्सव करण्यात आला. या  उत्सवासाठी परिसरातील भाविक भक्त यांनी मंदिरात येऊन देवीचे दर्शन घेतले. व प्रसादाचा लाभ घेतला.  यावेळी कुंभारगाव येथील श्री पृथ्वीराज व प्रवीण प्रतापराव देसाई यांनी वडिलांच्या स्मरणार्थ कै. प्रतापराव खाशेराव देसाई यांचे नावे श्री लक्ष्मी अंबाबाई देवी चरणी एक नगारा भेट देण्यात आला त्याचे सूर्यकांत खाशेराव देसाई यांचे हस्ते देवी चरणी अर्पण करण्यात आले. यावेळी श्री लक्ष्मी अंबाबाई देवी देवस्थान कमिटीचे पदाधिकारी, कुंभारगाव ग्रा, प, सरपंच सौ सारिका पाटणकर, उपसरपंच राजेंद्र चव्हाण, प्रदीप देसाई, राजेंद्र देसाई, जयवंत पाटील, प्रकाश देसाई व ग्रामस्थ  उपस्थित होते.Popular posts
मोरेवाडी ता पाटण येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिर जीर्णोद्धार व 15 व्या वर्धापन वर्षारंभ निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन.
इमेज
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय!
इमेज
तुकाराम गुरव यांचे दुःखद निधन
इमेज
पाटण तालुक्यातील विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
इमेज
मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदी घोणशीची ऐश्वर्या गुरवची निवड.खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सत्कार.
इमेज