डाॅ.संदीप डाकवे यांना राज्यस्तरीय महात्मा फुले आदर्श समाजसेवक पुरस्कार जाहीर

तळमावले! कृष्णाकाठ वृत्तसेवा:

पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील डाॅ.संदीप डाकवे यांना सामाजिक क्षेत्रातील राज्यस्तरीय राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले आदर्श समाजसेवक पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. संविधान दिनाचे औचित्य साधून रविवार दि.28 नोव्हेंबर, 2021 रोजी दुपारी 12 वाजता यशवंतराव चव्हाण स्मृती सदन कराड येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

कराड येथील परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी संविधान दिनाचे औचित्य साधून या पुरस्काराचे वितरण केले जाते. या वर्षीही विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांना या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने डाॅ.डाकवे यांनी विविध सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवले आहेत त्याची दखल घेवून सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती परिवर्तन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाज भूषण आप्पासाहेब गायकवाड यांनी दिली आहे. या पुरस्काराबद्दल डाॅ.डाकवे यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Popular posts
मोरेवाडी ता पाटण येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिर जीर्णोद्धार व 15 व्या वर्धापन वर्षारंभ निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन.
इमेज
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय!
इमेज
तुकाराम गुरव यांचे दुःखद निधन
इमेज
पाटण तालुक्यातील विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
इमेज
मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदी घोणशीची ऐश्वर्या गुरवची निवड.खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सत्कार.
इमेज