गृहराज्यमंत्री ना.देसाईंकडुन डाॅ.संदीप डाकवेंना शाबासकी


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

ना. शंभुराज देसाईंच्या वाढदिवसानिमित्त कारखाना कार्यस्थळावर अनेकांनी गर्दी केली होती. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी डाॅ.डाकवे यांनी 72 वहयांच्या माध्यमातून ना.देसाई यांचे चित्र तयार केले होते. त्या वहयांच्या पासुन साकारलेल्या प्रतिमेची फ्रेम देताच ना. शंभूराज देसाई यांनी डाॅ.डाकवे यांचे जाहीर कौतुक केले. ‘‘अरे वा संदीप, खुपच छान केलंयस चित्र....सुंदर संकल्पना आहे’’ असे म्हणत त्यांनी संदीपच्या प्रेमळ भेटीचा स्वीकार केला. यावेळी त्यांच्यासोबत हेमंत तुपे, शिवाजी सुर्वे, बाजीराव पवार, संतोष कदम सर, देवबा वायचळ सर, आदेश नरवाडे, प्रशांत बागल, अजित कचरे व इतर इतर मान्यवर उपस्थित होते.

गेले काही वर्षापासून डाॅ.संदीप डाकवे ना. देसाई यांना वाढदिवसानिमित्त् आगळयावेगळया कलात्मक भेटी देत असतात. यावर्षी त्यांनी दिलेल्या कलात्मक भेटीची चर्चा कारखाना कार्यस्थळावर चांगलीच होती.