चेंबूरमधील कोरोना बळींच्या कुटुंबाला नितीश राणेंच्या हस्ते आर्थिक मदत


मुंबई|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

 चेंबूरच्या घाटले गाव परिसरातील प्रभाग क्रमांक १५३ मधील कोरोना काळात बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना भाजपच्यावतीने आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले.खारदेवनगर येथे झालेल्या या कार्यक्रमात भाजपचे आमदार नितेश राणे यांच्याहस्ते अशा २५ कुटुंबियांना आर्थिक मदतीचे धनादेश देण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन भाजपचे चेंबूर विधानसभा सचिव अनिल बेनिवाल यांनी केले होते.यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर,जिल्हा महामंत्री विलास आंबेकर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल ठाकूर, चेंबूर विधानसभा अध्यक्ष राहुल वाळंज,वार्ड अध्यक्ष सचेतन पोसम,चेंबूर विभाग प्रचार व प्रसिद्धी प्रमुख विलास पराडकर आणि या कार्यक्रमाचे आयोजक अनिल बेनिवाल आदी मान्यवर उपस्थित होते.