" हाक तुमची साथ आमची " उपक्रमाअंतर्गत राजे संघर्ष प्रतिष्ठान तर्फे श्री वाल्मिकी विद्यामंदिरास भरीव मदत

वाल्मिकी विद्यामंदिरास आधुनिक डिजिटल ज्ञानप्राप्तीसाठी दोन स्मार्ट टी.व्ही. संच देताना राजे संघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेशजी पाटणकर व इतर मान्यवर.
तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
श्री वाल्मिकी विद्यामंदिर तळमावले येथे नुकत्याच  पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये युवा उद्योजक व समाजसेवक राजे संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष योगेशजी पाटणकर यांनी " हाक तुमची, साथ आमची" उपक्रमाअंतर्गत राजे संघर्ष प्रतिष्ठान तर्फे विद्यालयातील विद्यार्थ्यांना आधुनिक डिजिटल ज्ञानप्राप्तीसाठी दोन स्मार्ट टी.व्ही. संच देऊन भरीव मदत केली.

    याप्रसंगी बोलताना योगेशजी पाटणकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास घडवून आणावयाचा असेल तर आधुनिक अद्यावत शिक्षण घेण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, विद्यार्थी हा परीक्षार्थी न होता तो विद्यार्थी बनावा , विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कलागुणांचा विकास करून घ्यावा, तसेच विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा सोबतच सामाजिक मानसिक व भावनिक दर्जा उंचावणे गरजेचे आहे, असे आवाहन केले. 

 या वेळी राजे संघर्ष प्रतिष्ठानचे सदस्य राजेंद्र देसाई बोलताना म्हणाले की विद्यार्थ्यांनी ज्ञान वृद्धी व स्वतःच्या जडणघडणी कडे विशेष लक्ष द्यावे.

    विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक माने यांनी विद्यार्थ्यांना अध्यावत ज्ञान प्राप्तीसाठी केलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल राजे संघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेशजी पाटणकर व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

    विद्यालयाचे देणगी समितीचे प्रमुख प्रमोद ताईगडे, विद्यालयाचे शिक्षक प्रतिनिधी शिवाजी सूर्यवंशी, राजे संघर्ष प्रतिष्ठानचे सदस्य राजेंद्र देसाई, करपेवाडीचे सरपंच रमेश नावडकर, सुनिल चाळके, प्रदीप देसाई व तुषार माने उपस्थित होते.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सांस्कृतिक विभाग प्रमुख परशराम जंगाणी यांनी केले. सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार विद्यालयाचे प्रभारी पर्यवेक्षक प्रमोद काशीद यांनी मानले.