ना.शंभूराज देसाई यांनी वाढदिवसानिमित्त युवकांना केले "हे" आवाहन ?


पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
सध्या विविध हॉस्पीटलमध्ये अनेक आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना रक्ताची मोठी गरज भासत आहे.परंतु सध्या रक्तपेढीमध्ये कमी प्रमाणांत रक्तसाठा उपलब्ध असल्याने रक्त आवश्यक असलेल्या रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.पुरेशा रक्ताअभावी रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी म्हणून दि.17 नोव्हेंबर 2021 रोजी दौलतनगर,ता.पाटण येथे आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होऊन उत्स्फुर्तपणे रक्तदान करावे,असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले आहे.

            ना.शंभूराज देसाई यांनी पुढे म्हंटले आहे की,महाराष्ट्रासह आपला देश कोविड सारख्या महाभयंकर महामारीला समर्थपणे सामोरे जात असताना कोविड संसर्गामुळे जास्त प्रादुर्भाव झालेले अनेक रुग्ण आज वेग-वेगळया दवाखान्यांमध्ये औषधोपचार घेत आहेत.तसेच दैनंदिन होणारे रस्ते अपघामध्ये जखमी झालेले रुग्ण असो की वेग-वेगळया आजारांवर औषधोपचार घेणाऱ्या रुग्णांना सध्या मोठया प्रमाणांवर रक्ताची गरज भासत आहे.परंतु रक्तपेढयांमध्ये रक्ताचा उपलब्ध साठा बघितला तर तो खुपच कमी प्रमाणांत असून रक्ताच्या तुटवडयामुळे अनेक रुग्णांचे रक्ताअभावी मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे राज्य शासनाकडूनही रक्तदान करण्यासाठी वेळो-वेळी आवाहन केले जात असून या रक्तदान शिबिरांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याने काही प्रमाणांत रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यास मदत झाली आहे.रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून त्याचाच एक भाग म्हणून वाढदिवसाचे औचित्य साधून विविध दवाखान्यांमध्ये औषधोपचार घेत असलेल्या रुग्णांना रक्त पुरवठा करण्यास मदत होण्याचे करीता सामाजिक बांधिलकीच्या हेतूने दि.17 नोव्हेंबर 2021 रोजी दौलतनगर, ता.पाटण येथे श्रीमती विजयादेवी देसाई ज्यूनिअर व सिनिअर कॉलेज दौलतनगर येथे तालुकास्तरीय महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या महारक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होऊन रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी शेवटी केले आहे.