सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार : योगेश पाटणकर

विविध सामाजिक उपक्रमांनी वांग खोऱ्याच्या समाजसेवकाचा वाढदिवस उत्साहात साजरा.तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा :
कुंभारगावचे सुपुत्र युवा उद्योजक व सच्चे समाजसेवक योगेश पाटणकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने "राजे संघर्ष प्रतिष्ठान" च्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विभागातील अनेक गावात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले व यांच्या हस्ते विविध शैक्षणिक, सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला तर त्यांच्या तळमावले ता.पाटण येथील "राजे संघर्ष प्रतिष्ठान" च्या कार्यालयात हजारो कार्यकर्त्यांनी समक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

सहकार, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष व फोन करून पाटणकर यांना भविष्यातील स्वप्नपूर्तीसाठी शुभेच्छा दिल्या. यामध्ये माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, सातारा लोकसभा खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आमदार शशिकांत शिंदे, सत्यजितसिंह पाटणकर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माहिती व तंत्रज्ञान विभाग सारंग पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य, हिंदुराव पाटील, पाटण पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, उपसभापती प्रल्हाद भाऊ देसाई, राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेते राहुल चव्हाण, माजी उपसभापती रमेश मोरे, जन सहकार निधीचे चेअरमन मारुतीराव मोळावडे, दैनिक कृष्णाकाठचे संपादक चंद्रकांत चव्हाण या मान्यवरांचा समावेश होता.

"राजे संघर्ष प्रतिष्ठान" च्या वतीने तळमावले येथील त्यांच्या कार्यालयात केक कापून हजारो कार्यकर्त्यांनी वाढदिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या.

तसेच कराड येथील खासदार श्रीनिवास पाटील यांच्या कार्यालयातही खासदार श्रीनिवास पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सारंग पाटील बाबा तसेच योगेश पाटणकर यांच्या सुविद्य पत्नी व कुंभारगाव च्या सरपंच सौ सारिका पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांचे त्यांनी आशीर्वाद घेतले.

योगेश पाटणकर यांनी वाढदिवसा दिवशी सकाळी पाल येथील खंडोबा देवाचे व कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन नंतर विविध सामाजिक उपक्रमास सुरुवात केली. प्रथम कोळे ता.कराड येथील जिजाऊ अनाथाश्रमातील मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले नंतर करपेवाडी येथील मोफत आधार कार्ड, पॅन कार्ड, युनिव्हर्सल पास अशा विविध मोफत सुविधा देणाऱ्या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. "राजे संघर्ष प्रतिष्ठानच्या" या सामाजिक उपक्रमाचे विभागातील सर्व जनतेने कौतुक केले तसेच कुंभारगाव, काळगाव बीट मधील अंगणवाडी मधील बालकांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. कार्यकर्त्यांनी विभागातील अनेक गावात सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले होते त्याचा शुभारंभ ही उत्सवमूर्ती योगेश पाटणकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी "राजे संघर्ष प्रतिष्ठानचे" सर्व पदाधिकारी विभागातील सरपंच उपसरपंच, विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवसभर कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना व प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले माझा वाढदिवस सर्व कार्यकर्त्यांनी उत्साहात केला अनेक सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले व सर्व उपक्रम यशस्वी केले. सर्व उपक्रम समाजाशी निगडित होते गरीब व गरजूंना मदतीचा हात देण्यारे उपक्रम होते. हे फक्त आज वाढदिवस आहे म्हणून आम्ही करत नाही तर "राजे संघर्ष प्रतिष्ठान" च्या वतीने गरजू व सर्वसामान्य जनतेला संकटसमयी मदतीचा हात देण्याचे व त्यांचे दुःख दूर करण्याचे कार्य सामाजिक बांधिलकी म्हणून गेले पाच वर्ष आम्ही करत आहोत व यामध्ये आम्ही आपला व परका तसेच राजकीय कोणताही भेदभाव करत नाही तर अडचणीतला माणूस व माणुसकी एवढेच डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्यांच्या हितासाठी माझे राजे संघर्ष प्रतिष्ठान खूप मोलाची कामगिरी करत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या मार्गदर्शनाखाली राजे संघर्ष प्रतिष्ठान मध्ये सहभागी झालेले हजारो मावळे आज एका छत्राखाली सामाजिक बांधिलकीचे कार्य करत आहेत हीच माझ्या दृष्टीने खऱ्या अर्थाने समाजाची सेवा होय. ही समाजाची सेवा मी व माझे कार्यकर्ते भविष्यात यापुढेही अधिक जोमाने व अखंडपणे सुरू ठेवणार आहोत. माझी कर्मभूमी मुंबई असली तरी जन्मभूमीचे आणि माझे नाते घट्ट आहे येथील मातीशी माझी नाळ आहे येथील गोरगरीब, गरजू सर्वसामान्यांच्या हितासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. त्यांचे प्रश्न ते माझे प्रश्न आहेत त्यांच्या सर्व सुख, दुःखात मी कायम सहभागी असणार आहे. सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू मानून मागील पाच ते सहा वर्षात समाजसेवेचे कार्य करीत आहे यापुढेही या सर्वसामान्य जनतेच्या हितासाठीच कटिबद्ध राहीन अशी मी आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या या वांग खोऱ्यातील सर्व बंधू-भगिनींना ग्वाही देतो.

माझ्या वाढदिवसानिमित्त समाजातील सामाजिक, राजकीय, सहकार, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर व कुंभारगाव,काळगाव विभागातील अनेक सर्वसामान्य जनतेने मला प्रत्यक्ष भेटून व फोनद्वारे शुभेच्छा दिल्या त्यांचे प्रेम माझ्यावर असेच अखंड राहू देत त्यांच्या या प्रेमाबद्दल मी खरोखर ऋणी आहे. मी या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचे, सर्वसामान्य जनतेचे आभार मानतो. त्याचबरोबर शिक्षण, सहकार, राजकीय, व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचे ही मी आभार व्यक्त करतो.