ढेबेवाडी खोऱ्यात शिकाऱ्यांच्या टोळीवर वन विभागाची मोठी कारवाई.9 जिवंत हातबॉम्ब सह तिघेजण जेरबंद. दोन दुचाकीही ताब्यात. दोन रानडुकरांची शिकार

ढेबेवाडी|कृष्णाकाठ वृत्तसेवा :

ढेबेवाडी वनक्षेत्रात गावठी हातबाँबच्या सहाय्याने रानडुकरांच्या शिकारीसाठी आलेल्या भुरट्या शिकाऱ्यांना ढेबेवाडी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 9 हातबाँब व दोन मोटरसायकलसह 5 जणांना रंगेहाथ पकडले आहे.त्यांच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 कलम 9 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र अंधार आणि जंगलाचा फायदा घेत दोन आरोपी फरार झाले आहेत.

     याबाबत ढेबेवाडी वनक्षेत्रातील भोसगांवचे वनपाल सुभाष राऊत यांनी दिलेल्या माहिती नुसार गुप्त माहितगारांकडून वनविभागास मिळालेल्या माहितीनुसार भोसगांव ता.पाटण येथील फाँरेष्ट कंपार्टमेंट नं.553 मधे रानडुकरांची शिकार करण्याच्या उद्देशाने कांही इसम आलेले आहेत त्या माहितीच्या आधारे वनपाल भोसगांव,वनरक्षक घोटील,कायम वनमजूर,हंगामी वनमजूरांसह त्या क्षेत्रात जाऊन तपास केला असता तिथे अजय पोपट कोळी रा.भेदाचौक कराड,उमेश नेताजी मदने,महेश भिमराव मंडले रा.दुधोंडी ता.पलूस असे मिळून आले.त्यांच्याकडे तपासणी करता 6 गावठी हातबाँब,दोन मोटारसायकलअसा माल मिळून आला.वरील आरोपी विरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून वरील माल जप्त करून 3 आरोपी ताब्यात घेतले आहेत.

--------------------------------------------------

दरम्यान राजपूत नावाचे दोन (राजस्थानी)आरोपी रा.धोंडेवाडी ता.कराड हे अंधाराचा आणि जंगली झाडाझुडपांचा फायदा घेत फरार झाले आहेत त्यांचा तपास सुरु आहे. अशी माहिती संबधितांनी दिली आहे.

------------------------------------------------------

    भोसगांवचे वनपाल सुभाष राऊत,घोटीलचे वनरक्षक जयवंत बेंद्रे,काळगांवचे वनरक्षक विशाल डुबल,खळे वनरक्षक सुतार, कुंभारगावचे वनरक्षक विशाल पाटील, सणबूरचे वनरक्षक अमृत पन्हाळे, कायम वनमजूर मुल्ला, सातपुते, हंगामी वन मजूर नथुराम थोरात,अनिकेत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.पुढील तपास सुरु आहे.

----------------------------------------------------------