येणके येथे बिबट्याने 5 वर्षांच्या बालकावर हल्ला करून केले ठार.

 ्






येणके| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

येणके ता.कराड येथे ऊस तोडणीसाठी निघालेल्या ऊस कामगार टोळीतील 5 वर्षाच्या मुलाला रस्त्यावरून उचलून ऊसाच्या शेतात नेऊन ठार मारल्याने सर्वत्र एकच हलकल्लोळ माजला आहे.ऊस तोडणीवर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे.तर वारंवार होणारे बिबट्याचे हल्ल्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी संतप्त येणके करांनी केली आहे.

     याबाबत येणके ता.कराड येथील ग्रामस्थ रयत सह. साखर कारखान्याचे घारेवाडी गटाचे गट अधिकारी,तसेच वन विभागाकडून मिळाले माहितीनुसार आज सोमवार सकाळी 7 च्या दरम्यान रयत सह साखर कारखान्याकडे ऊस तोडणीचे का करणाऱ्या टोळीतील बिगाशा गोदी भिल व चिन्या बिगाशा भिल हे पती पत्नी चे जोडपे अन्य मजुरांबरोबर ऊस तोडणीसाठी येणके किरपे रस्त्याने निघाले असता चिन्या भिल ही महिला इतरांच्या पाठीमागे काही अंतरावर एक लहान मुल काखेवर व आकाश नावाचा 5 वर्षे वयाचा मुलगा तिच्या बरोबर चालत निघाले होते त्यावेळी इनाम नावाच्या शिवाराजवळ उसाच्या शेतीतून अचानक बिबट्याने झेप घेऊन आईच्या समक्ष आकाशला तोंडात मानगूट पकडून ऊसाचे शेतात धुम ठोकली.

           अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या आईने आरडाओरडा केला तेंव्हा ऊसतोड टोळीतील किमगार व स्थानिक ग्रामस्थ जमा झाले व त्यानी ऊसाच्या शिवारात शोधाशोध सुरू केली तेंव्हा आकाशला सोडून बिबट्या पळून गेला पण तो पर्यंत नरड्यातून रक्तस्त्राव होऊन आकाश मयत झाल्याचे निदर्शनास आले.

         स्थानिक नागरिक तसेच रयत साखर कारखान्याचे कर्मचाऱ्यांनी वन विभागाशी संपर्क साधला,जिल्हा उपवन अधिकारी महादेव मोहिते, कराडचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार नवले,.कोळे वनपाल बी.सी.कदम,मलकापुरचे वनपाल सवाखंडे,कोळ्याचे वनरक्षक राठोड, मलकापुरचे वनरक्षक जाधवर,म्हासोलीचे वनपाल सुभाष गुरव,वनमजूरअरूण शिबे,मयुर जाधव,कोळे पोलिस स्टेशनच्या सपोनि श्रीमती दुधभाते अन्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

      दरम्यान वनविभागाने घटनेचा पंचनामा केला आहे,कराडच्या उपजिल्हा रूग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आल्या नंतर वनविभागाच्या येणके येथील कार्यक्षेत्रात स्थानिक ग्रामस्थ, वनविभागाचे अधिकारी, तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेहाचा शोकाकुल वातावरणात दफनविधी उरकण्यात आला.