सातारा जि.म. बँकेच्या निवडणूकीसाठी कराड सोसायटी मतदार संघाचे 100 टक्के मतदान शांततेत पूर्ण


कराड |कृष्णाकाठ वृत्तसेवा:

सातारा जिल्हा मध्यवर्ती  सहकारी  बँकेसाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज मोठ्या उत्साहात मतदान झाले. 

यापूर्वी आकरा जागा बिनविरोध झाल्या असून दहा जागेसाठी मतदान झाले. विशेषता कराड सोसायटी मतदार संघात अत्‍यंत शांतपणे १००%मतदान झाले. गेल्या दीड महिन्यापासून या निवडणुकीची प्रक्रियासुरू होती या प्रक्रियेमध्ये अनके प्रकारची स्थित्‍यंतरे घडत गेली मी व्यक्तिशःसर्वांशी चर्चा केली आणि निवडणुकीला उभे राहण्याचा निर्णय घेतला सर्वांकडून अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला असे प्रतिपादन कराड सोयायटी मतदार संघाचे उमेदवार आणि राज्‍याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्‍ह्‍याचे पालक मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केले.

कराड यथील श्री शिवाजी विद्यालयामध्ये मतदान केंद्रावर 
मतदानाचा हक्‍क बजावल्‍यानंतर कार्यकर्त्यांशी ते बोलत होते.

नामदार बाळासाहेब पाटील पुढे म्‍हणाले की कराड तालुका हा मूळचा दोन विधानसभा मतदार संघात विभागलेला असून तालुक्याचा काही भाग पाटण विधानसभा मतदार संघात गेला आहे या निवडणूकीसाठी मतदारांमध्ये अतिशय उत्साह होता. सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे सहकार्य केले.कराड तालुक्यामध्ये या निवडणूकीकरीता डॉ.सुरेश भोसले,मदनराव मोहिते,डाँ.अतुल भोसले,मानसिंगराव जगदाळे,देवराजदादा पाटील,जेष्ठमार्गदर्शक भीमरावदादा पाटील, आनंदराव पाटील(नाना), जगदीशदादा जगताप, पै.धनाजीपाटील, दयानंद पाटील, राजेश पाटील वाठारकर, राजाभाऊ पाटील-उंडाळकर यांचेसह तालुक्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवर,कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक मतदारांनी व्यक्तिशः भेटून पाठिंबा दिला काही मंडळीनी राजकीयदृष्ट्या भाष्य करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यालाही लोकांनी वेळोवेळी चांगल्या प्रकारचे उत्तर दिले. या तालुक्यातील सर्व लहानथोर कार्यकर्ते यांनी ऊन,वारा,पाऊस याची तमा न बाळगता सर्वांनी सहकार्य केले, त्‍याबद्दल नामदार बाळासाहेब पाटील यांनी आभार व्यक्‍त करून त्‍यांचे प्रति ऋण व्यक्‍त केले आहेत.