राष्ट्रवादीच्या पनवेल जिल्हा उपाध्यक्षपदी सुरेश रांजवन यांची निवड

 

सुरेश रांजवण यांना नियुक्ती पत्र देताना पनवेल जिल्हाध्यक्ष सतीश पाटील.

शिराळा | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
रांजणवाडी(मेणी)चे रहिवासी व सध्या खारघर(मुंबई) येथे आपल्या व्यवसाय धंद्या निमित्त स्थायिक झालेले उदयोजक, सामाजिक कार्यकर्ते सुरेश रांजवण यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष पदी नुकतीच राष्ट्रवादी पक्षाने निवड जाहिर केली आहे. त्यांच्यावर या महत्वपूर्ण पदाची जबाबदारी सोपविन्यात आली आहे.
 सुरेश रांजवण हे यापूर्वी पक्ष्याच्या खारघर शहराची जबाबदारी सांभाळत होते. त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादी पक्षाचे प्रामाणिकपणे व पक्षाशी निष्ठावंत राहून कार्य केल्याने व सामाजिक उपक्रम व विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजात एक सच्चा व तळमळीचा कार्यकर्ता म्हणून जनसामान्यात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे पक्षाने त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांचेवर पनवेल शहराच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नियुक्तिचे पत्र त्यांना जिल्हाध्यक्ष नगरसेवक सतीश पाटील यांनी दिले आहे. रांजवन हे शिराळयाचे आमदार मानसिंगराव नाईक यांचे कट्टर समर्थक असून आ. नाईक यांच्या मुंबई येथे होणाऱ्या सर्व बैठकांचे व सर्व कार्यक्रमांचे नियोजन ते करतात. राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी त्यांची सुरु असणारी धड पड लक्षात घेवून त्यांना पक्ष्याचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी ही संधी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या नियुक्तिचे आदेश दिले होते.