मलकापूर शहरामध्ये पोलिओ लसीकरण जनजागृती रॅलीचे उद्या आयोजन.

कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा :

उद्या रविवार दिनांक २४आक्टोंबर २०२१ रोजी सकाळी ७.३० ते ९.३० वाजता रोटरी क्लब मलकापूर आणि मलकापूर नगरपरिषद मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पोलिओ दिनानिमित्त भव्य कार रॅलीचे आयोजन केले आहे.

रोटरीने संपूर्ण जगामधून पोलिओ निर्मूलनाचे एक खूप मोठे कार्य हाती घेतले आहे त्या कार्याच्या फलीताच्या आपण अगदी जवळ आलो आहोत तरी आपल्या मलकापूर शहरामध्ये पोलिओ लसीकरण जनजागृती करण्यासाठी आपण सर्वांनी कृपया या रॅलीमध्ये सहभागी होवून समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपुया.असे आवाहन मलकापूर नगरपंचायत व मलकापूर रोटरी क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.

रॅलीचा मार्ग व काही मार्गदर्शक सूचना खालील प्रमाणे आहेत

१.आपण सर्व सभासदांनी उद्या सकाळी ठीक ७.३० वाजता बैलबाजारगेट येथे आपल्या चारचाकी गाडी सह उपस्थित रहावे

२.रॅलीचा प्रारंभ सकाळी ठीक ८ वाजता मलकापूरच्या प्रथम नागरिक, मलकापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. निलम येडगे रॅलीस हिरवा झेंडा दाखवून करतील

३.तेथुन पुढे रॅली मलकापूर कन्या शाळा,लक्ष्मी मंदिर, मलकापूर फाटा बोगद्यातून डि मार्ट,पाच मंदिर, कृष्णा हाॅस्पिटल, ढेबेवाडी फाटा, इमर्सन कंपनी वरुन यु टर्न घेऊन मलकापूर नगरपरिषद ऑफिस येथे सांगता मलकापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आदरणीय श्री. राहुलजी मर्ढेकर यांच्या हस्ते होईल.

४. आपल्या गाडीमध्ये आपण आणि आपल्या गाडीचे चालक असे ज्यास्तीत ज्यास्त दोनच व्यक्ती असाव्यात.

५. आपल्याकडे चार चाकी गाडी उपलब्ध नसल्यास दोन चाकी गाडी चालेल, परंतु दोन चाकी गाडी वरती एकट्यानेच हेल्मेट घालूनच रॅली मध्ये प्रवास करायचा आहे.

५. सर्व सभासदांनी पांढरा शर्ट परिधान करून यायचा आहे.

६. सर्व यशस्विनी सभासदांनी तुमच्या क्लब मध्ये चर्चा करून विशिष्ट रंगाचा फेटा बांधून आले तरी चालेल म्हणजे आपल्या क्लबचे वेगळेपण समाजामध्ये उठून दिसेल. ज्यांची दोन चाकी गाडी असेल त्यांनीसुद्धा फेटा बांधून आले तरी चालेल.

७.आपले कोणी मित्र ,मैत्रीणी रॅली मध्ये येवू इच्छित असल्यास त्यांनाही आमंत्रित केले तरी चालेल.

८. सर्वांनी वाहतूकीच्या नियमांचे आणि वाहतूक पोलीसांनी दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करायचे आहे, रस्त्याच्या डाव्या बाजूने आपली वाहणे ज्यास्तीत ज्यास्त २० ते २५ किलोमीटर प्रति तास या वेगाने एका पाठीमागे एक चालवुन , वाहतूकीस कोणताही अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी

९.सांगता समारंभात मान्यवरांचे मनोगत व्यक्त केले जाईल, अल्पोपहार होईल आणि रॅली संपेल. अशी माहिती रोटरी क्लब मलकापूर चे अध्यक्ष रो.अमर जाधव, प्रोजेक्ट डायरेक्टर: रो. सलीम मुजावर, यशस्वीनी रो. सौ.उज्वला कदम, प्रोजेक्ट डायरेक्टर: रो.सौ.कविता कचरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.