कराड तालुक्यातील कृष्णाकाठ च्या तुतारीने गाजवली दुबई.

कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

कराड तालुक्यातील कृष्णाकाठची तुतारी दुबईत गाजली. कराड तालुक्यातील कार्वे गावचे सुपुत्र कृष्णत काकासाहेब गुरव व वाटेगाव चे सुपुत्र श्री. पांडुरंग शंकर गुरव सध्या राहणार मुंबई कांदीवली या दोघांनी महाराष्ट्रीयन तुतारीची परदेशातील दुबईला भुरळ पाडली. प्रसिद्ध उद्योजक मसाला किंग डॉ.धनंजय दातार यांच्या मुलाच्या ऋषिकेश दातार आणि आकांक्षा यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या तुतारीचे आयोजन करण्यात आले होते. दि २१/१०/२०२१ रोजी दुबई येथील ताज हाँटेल मध्ये हा साखरपुड्याचा शानदार कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमात कृष्णाकाठच्या या दोन कलाकारांनी तुतारी वाजवली. या तुतारीच्या आवाजाने उपस्थितांची वाहवा मिळवली. त्यांच्या तुतारीच्या आवाजाने परदेशी पाहुणे खुश झाले तुतारीच्या आवाजाने कार्यक्रमात एक वेगळा उत्साह व जल्लोष पाहायला मिळाला. सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले. महाराष्ट्रातील या दोन कलाकारांना त्यांच्या कलेचे कौतुक म्हणून तब्बल १० हजार रूपयांचे बक्षीस म्हणून दिले. कराड तालुक्यातील कृष्णाकाठच्या कलाकारांचे परदेशातील दुबईत सुद्धा सर्वांनी दमदार कौतुक केले. त्यामुळे तुतारीचा आवाज दुबईत सुद्धा गाजला.

दुबई ला जाण्याची संधी कशी मिळाली व एवढ्या मोठ्या कार्यक्रमात कसे पोहोचलात याबाबत कृष्णाकाठच्या या सुपुत्रानी दैनिक कृष्णाकाठ ला माहिती देताना सांगितले की मंगलमय वातावरण निर्माण करणाऱ्या तुतारीमुळे आत्ता खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होणार आहे. कोरोनाचे संकट त्यात कोरोना टेस्ट करत करत दुबईत पोहोचलो. अनेक संकटांना सामोरे जात जात ऐकदाची संधी मिळाली व त्या संधीचे सोने करता आले.मुंबईतील उत्कृष्ट सुत्र संचालीका सौ.उत्तरा मोने मँडम यांनी ही संधी उपलब्ध करून दिली. त्यांचा खुप मोठा विश्वास होता वाटेगावचे सुपुञ व सध्या कांदिवली मुंबईत रहात असलेले श्री .पांडुरंग शंकर गुरव व कार्वे तालुका कराड येथील सुपुञ श्री.कृष्णत काकासाहेब गुरव या दोघांनी तुतारी वाजवून संपुर्ण दुबई हादरून सोडली परदेशी पाहुण्यांना तुतारी खुप आवडली व त्यांना तुतारी सोबत फोटो घ्यायचा मोह आवरला नाही. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील तुतारीला प्रदेशातील दुबईत सुद्धा सन्मान व बहुमान प्राप्त झाला. मराठी उद्योजक डाँ.विठ्ठल कामत यांच्या दुबईतील हाँटेल मध्ये मेजवानी व हाँटेल रेव्हियर येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. व आयोजकांनी आम्हाला कार्यक्रम झाल्यानंतर संपुर्ण दुबई दर्शन घडवले. जग प्रसिध्द भुर्ज खलीफा इमारत व मार्केट अशा अनेक ठिकानांना भेट देता आली. मुंबईतुन पारंपारिक लेझीम, मंगळा गवर अशा कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. अभिनेञी सोनाली कुलकर्णी व अमृता खानविलकर अशा ४२ कलावंताना संधी मिळाली होती. संपुर्ण नृत्य कार्यक्रमाला नृत्य दिग्दर्शक मयुर वैद्य यांचा खुप हातभार होता. न भुतो न भविष्यतो असा देखना सोहळा पाहताना डोळ्यांचे पारणे फिटले.

आमच्या तुतारीने तर सुरवातीपासुन शेवट पर्यंत कार्यक्रमात जोश व स्फुर्ती कायम ठेवली होती.कोरोनाच्या संकटावर मात करत प्रथमच परदेशी वारी मिळाली ती पण मराठी उद्योजकांच्या घरची त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात तुतारी वाजवण्याचे कला व कौशल्य दाखवता आले सर्वसामान्य कलेसाठी कलाकारासाठी ही जणू सोनेरी संधी होती व ही खूप मोठी संधी मिळाली हे आमचे खूप मोठे भाग्य आहे.हा आनंद गगनात न मावनारा आहे कोरोना मुळे दोन वर्षा पासुन तुतारीचे कार्यक्रम कमी झाले होते पण दुंबई दौरा केल्यानंतर पुन्हा तीला सुवर्ण दिवस येथील दिवाळी नंतर लग्न सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रम मिळायला सुरवात होईल अशी अपेक्षा आहे. या आगोदर 6 वर्षांपूर्वी जपान दौऱ्याची संधी सुदैवाने प्राप्त झाली होती मात्र त्यावेळी महाराष्ट्रात दुष्काळ असल्यामुळे ती संधी हुकली होती याचे शल्य मनात आजपर्यंत होते. त्या नंतर तब्बल ६ वर्षे वाट पहावी लागली सहा वर्षाच्या तपानंतर आमच्या कलेने तुतारीच्या आवाजाने जीवनात पहिल्यांदाच दुबई सारख्या देशात आम्हाला जाण्याची संधी मिळाली हे आमचे खूप मोठे भाग्य आहे. ज्यांच्यामुळे ही संधी मिळाली त्यांचे आम्ही निश्चितच ऋणी आहोत‌. परदेशातील तुतारीच्या या कलेचा खूप मोठा गौरव झाला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.