ढेबेवाडी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांच्या वतीने उधवणे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व मास्क चे वाटप.


उधवणे ता.पाटण जि. प.शाळेत ढेबेवाडी विभागाचे जि.प.सदस्य रमेश पाटील  यांच्या वतीने त्याचे जनसंपर्क अधिकारी संजय काळे विद्यार्थ्यांना मास्क व वह्यांचे वाटप करताना.

ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
तब्बल दिड वर्षानंतर 4 जाने.रोजी सुरू झालेल्या जिल्हा परिषद शाळेच्या पहिल्या दिवशी अधिकारी, पदाधिकारी यांची शाळेला भेट या उपक्रमाअंतर्गत ढेबेवाडी विभागाचे जि. प. सदस्य मा. रमेश पाटील यांच्या वतीने उधवणे ता.पाटण या शाळेला भेट देऊन त्यांचे जनसंपर्क अधिकारी संजय काळे यांनी विद्यार्थ्यांना यानिमित्ताने मास्क व वह्यांचे वाटप केले. 

          कोरोनामुळे गेल्या दिड वर्षापासून बंद असलेल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय शासन पातळीवर झाल्यानंतर मोठ्या कालावधीनंतर शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा किलकिलाट ऐकु येणार आहे विद्यार्थ्यांची आपल्या सवंगड्यांची  भेट होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

        शासनाने शाळा सुरू करणेबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्याचे पालन करून शाळा सुरू होत आहेत यामुळे शिक्षक, विद्यार्थ्यांबरोबर पालकांमध्ये सुद्धा समाधान व्यक्त केले जात आहे. सातारा जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन, स्थानिक ग्रामशिक्षण समिती, यांनी मुलांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने आवश्यक ती तयारी केली असून विद्यार्थ्यांचा यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.

           ढेबेवाडी विभागातील  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उधवणे ता.पाटण येथे जि.प.सदस्य रमेश पाटील यांच्यावतीने त्यांचे जनसंपर्क अधिकारी संजय काळे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मास्क व वह्यांचे वाटप केले.त्यांनी कोविड सुरक्षे संदर्भातील घ्यायची काळजी व उपाययोजना संदर्भात मार्गदर्शन केले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गर्डे,उपशिक्षक तरटे, कुंभार सर,कोळी मॅडम ,साळुंखे मॅडम ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.वैशाली साळुंखे, शिवाजी पाटील,पालक ,विद्यार्थ्यी उपस्थित होते.