ढेबेवाडीत पाण्यावाचून जनतेचे हाल

 ढेबेवाडी|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

ढेबेवाडीत गेल्या 3 दिवसांपासून पाण्यावाचून नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. उपलब्ध माहितीनुसार,

तांत्रिक बिघाड झाल्याने सोमवार दि.18 पासून ढेबेवाडी येथिल नळपाणी पुरवठा खंडित झाला आहे त्या मुळे लोकांचे पाण्यासाठी हाल सुरू आहे खरंतर दोन दिवस पाणी पुरवठा खंडित करुन ठेवण्या इतकी परस्थिती बिकट नव्हतीच पटकन काम पुर्ण करून गावात पाणी पुरवठा सुरळीत करण्या इतपत ग्रामपंचायत प्रशासनाची माणसिकता असायला हवी होती असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे

ढेबेवाडीयेथिल पाणी पुरवठा योजनेची विहीर भोसगाव येथिल वांग नदीच्या काठावर आहे तेथून दोन कि. मी. लोखंडी पाईप ने विहीर चे पाणी गावातिल टाकीत साठवून गावाला पाणीपुरवठा केला जातो मात्र येथिल नळपाणी पुरवठा योजनेच्या विहीरी वरील व्यवस्था उध्दवस्त झाल्याने पावसाळ्यात गावाला गढुळ पाण्याचा पुरवठा सुरू होता लोकांच्या मध्ये संतापाची भावना होती हे अपयश पुसण्यासाठी 

ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील आडावर मोटार पंप बसवून आडातील पाणी गावाला पुरवण्यास सुरुवात केली आहे मात्र तेही पाणी मुबलक स्वरूपात मिळत नसल्याने महिलांना डोक्यावर घागर घ्यावी लागत आहे दरम्यान सोमवारी तांत्रिक बिघाड झाल्याने 

पाणी पुरवठा खंडित झाला लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली घडलेल्या प्रकारा बद्दल ग्रामस्थांन मधुन संताप व्यक्त होत आहे दरम्यान तीन दिवस पाणी पुरवठा खंडित राहावा इतकी समस्या मोठी नव्हती मात्र पाणी पुरवठा खंडीत होउ नये गावातील लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागु नये लोकांचे पाण्यासाठी हाल होउ नये हि भावना ग्रामपंचायतमधील सत्ताधारी लोकांच्या मनात रुजायला हवी.तेंव्हा कुठे वेळोवेळी होणारी ही समस्या मिटेल

काही ना काही कारणांमुळे ढेबेवाडी मध्ये कायमच पाणी पुरवठा खंडित होत असतो मात्र पाणी पुरवठा खंडित झाल्यावर तो पुन्हा सुरळीत व्हावा यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न केला जात नाही तस्सा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

________________________________

तांत्रिक कारणामुळे पाणी पुरवठा खंडित झाला पण तिनं दिवस तो दुरुस्ती होत नाही हिच शोकांतिका आहे ग्रामपंचायत प्रशासनाचा बोंगळ कारभार चव्हाट्यावर येत आहे -सोमनाथ पाटील -ग्रामस्थ ढेबेवाडी.

________________________________