कुंभारगाव येथील आर्या राजेंद्र पवार हिची नवोदय विद्यालयासाठी निवड

 


कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
जि. प. प्राथमिक शाळा - बामणवाडी ( कुंभारगाव ), ता. पाटण या शाळेची विद्यार्थिनी कु. आर्या राजेंद्र पवार हिची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे.

दि. ११ आॕगस्ट २०२१ रोजी जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड परीक्षा झाली. दि. २९ सप्टेंबरला आॕनलाईन निवड यादी जाहीर झाली. 

या निवडीनंतर सर्व स्तरातून आर्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. पाटणच्या गटशिक्षणाधिकारी सौ. बोरकर मॕडम , कराडच्या गटशिक्षणाधिकारी सौ. मुजावर मॕडम , विस्तार अधिकारी श्री. प्रशांत आरबाळे साहेब , केंद्रप्रमुख श्री. मोळावडे साहेब , कुंभारगांव ग्रामपंचायत सदस्य महादेव वरेकर , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिपक शामराव लोहार, तसेच विविध शिक्षक संघंटनांच्या नेत्यांनी आर्याचे अभिनंदन केले आहे.

कु.आर्यास मुख्याध्यापिका सौ. संगिता जगन्नाथ देसाई मॕडम , वर्गशिक्षिका सौ. रुपाली पाटील मॕडम यांचे मार्गदर्शन लाभले.

आर्या लहानपणापासूनच विविध स्पर्धा परीक्षेत सुयश मिळवत आली आहे. ब्रेन डेव्हलपमेंट स्काॕलरशीप्स ( BDS) , मंभन प्रज्ञाशोध परीक्षा , श्रीविद्या प्रकाशनाची परीक्षा या परीक्षेत आर्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत झळकली आहे. पाटण पंचायत समितीमार्फत लोकनेते बाळासाहेब देसाई जयंतीनिमित्त आयोजित प्रश्नमंजुषा व पोवाडा गायन स्पर्धेचे विजेतेपदही आर्याने मिळवलेले आहे. सातारा जिल्हा परिषद आयोजित यशवंतराव चव्हाण बालक्रीडास्पर्धेत बुद्धिबळ स्पर्धेची मुलींच्या गटाचे विजेतेपदही आर्याने मिळवलेले आहे.