संतकृपा फार्मसी घोगावच्या विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये निवड
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
श्री संतकृपा शिक्षण संस्था घोगाव संचलित श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी घोगाव ह्या महाविद्यालयाच्या दहा विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये निवड झाली आहे. 

श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी घोगाव तर्फे विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांचे पूल कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित करण्यात आले होते यामध्ये टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस लिमिटेड मुबई या कंपनीत सायली निकम, थ्री जन कन्सल्टन्सी पुणे या कंपनीमध्ये अक्षय तोडकर, हर्षवर्धन पाटील, मंगेश थोरात, कल्याणी काळे, स्नेहल गायकवाड, मुस्कान मुल्ला, लुपिन फार्मा येथे शरद वाघ, फायझर या कंपनीमध्ये रोहन पाटील व गेब्स नवी मुंबई येथील कंपनीमध्ये काजल चौगुले अश्या विविध बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. 

या सर्व कंपनी औषधनिर्मिती व संशोधन क्षेत्रात जागतिक स्तरावरील अग्रगण्य कंपन्या आहेत. तसेच येणाऱ्या काळात रिलायन्स फार्मसी, व अद्व्हांत मेड ह्या कंपन्याचे पूल कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित करणायत येणार आहेत.

 येथे विद्यार्थ्यांचे कौशल्य व सर्व गुण संपन्न विकास व्हावा ह्यासाठी सर्वपरीने प्रयत्न केले जातात. त्याचाच भाग म्हणून महाविद्यालयाने औषधनिर्मिती व संशोधन क्षेत्रातील कंपन्यांशी सामंजस्य करार केले आहेत त्याचा हि फायदा विद्यार्थांना होतो

सदर निवड झालेल्या दहा विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे सचिव श्री प्रसून जोहरी यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थांना कॉलेजचे प्लेसमेंट को - ऑर्डिनेटर प्रा. अतुल कदम यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले. निवड झालेल्या विद्यार्थांचे संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पाटील, संस्थेचे सचिव श्री प्रसून जोहरी, उपाध्यक्षा डॉ. उषा जोहरी, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.व्ही.आर. आरलेलीमठ आदींनी अभिनंदन केले.