चेंबूरच्या घाटले गाव परिसरात सुरवंट किड्यांची मोठी दहशत
मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
गेल्या काही दिवसांपासून चेंबूरच्या घाटले गाव परिसरातील अनेक सोसायट्यांच्या घरांवर सुरवंट किड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.त्यामुळे नागरिक या सुरवंटाच्या दहशतीखाली वावरताना दिसत आहेत.तरी पालिकेने या भागात सरसकट घरे आणि परिसरातील झाडावर औषध फवारणी करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चेंबूर तालुका अध्यक्ष दीपक सावंत यांनी केली आहे.

घाटले परिसरातील झोपडपट्टी वजा चाळ्यांमधील घराची छपरे , भिंती, झाडे आणि परिसरात अनेक ठिकाणी सुरवंटांचे अस्तित्व दिसत आहे.हे सुरवंट माणसाच्या शरीराच्या ज्या भागावर पडते किंवा त्याचा स्पर्श जरी झाला तरी त्याठिकाणी खाज सुटते , मोठमोठे पुरळ येत आहेत.

कोरोनाचे संकट दूर असताना चेंबूरकरांवर हे सुरवंटाचे संकट आले आहे.पालिका कुठे तरी लोकप्रतिनिधीने सांगितले की तिथे औषध फवारणी करते पण ती सरसकट होणे गरजेचे असल्याचे मत दीपक सावंत यांनी व्यक्त केले आहे.या भागात झाडे आणि जुनी घरे आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी सुरवंट किड्यांचा वावर जास्त आहे .हे किडे चिकटून बसलेले असतात.त्यामुळे ते सहसा लोकांच्या नजरेस पडत नाहीत.पण त्याला स्पर्श झाल्यावरच खाज सुटली की त्याचे अस्तित्व जाणवते.