प्रा. सुरेश यादव यांना राज्यस्तरीय बेस्ट टिचर अवॉर्ड प्रदान


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
अविष्कार फौंडेशन, इंडिया ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वैद्यकीय व संस्कृती क्षेत्रात काम करत आहे.या संस्थेच्या रायगड जिल्हा शाखेचा कृतज्ञता सोहळा व जागतिक शिक्षक दिन गौरव समारंभात शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथील इंग्रजी विषयाचे प्रा. सुरेश रघुनाथ यादव यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील भरीव कामगिरीची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय बेस्ट टीचर पुरस्कार 2021 ने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम दीपमिलन बँक्वेट हॉल दीपासिटी, पनवेल जिल्हा रायगड येथे संपन्न झाला.

      अविष्कार फौंडेशन इंडिया यांच्यामार्फत 5 ऑक्‍टोबर हा जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. युनेस्कोने जाहीर केलेल्या या दिनाचे औचित्य साधून देशभरातील आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात येतो. या कार्यक्रमास शिक्षक आमदार बाळाराम पाटील, पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त सचिन पवार, राज्य लेखा समिती पुणे अध्यक्ष आदर्श सरपंच शहाजीराव क्षीरसागर, मुंबईचे समाजसेवक तथा युवा उद्योजक सुनील नारकर, मुंबई सुराज उद्योग समूहाचे चेअरमन सूर्यकांत कडाकणे, संस्थेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष पत्रकार संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

    या त्यांच्या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा प्राचार्या शुभांगीताई गावडे, प्रशासन सहसचिव डॉ. राजेंद्र शेजवळ, अर्थ सहसचिव प्राचार्य एस. एम. गवळी,माजी अर्थ सचिव प्राचार्य एस. के. कुंभार, माजी प्रशासन सहसचिव प्राचार्य आर. के. भोसले, आजीव सेवक प्राचार्य दिलीपराव संकपाळ, प्राचार्य प्रोफेसर डॉ. सतीश घाटगे, पत्नी डॉ.शारदा घाडगे-यादव, महाविद्यालय व संस्थेतील गुरुदेव कार्यकर्ते, शिक्षकेतर कर्मचारी, नातेवाईक, मित्र परिवार यांनी प्रा.यादव यांचे अभिनंदन केले.