यशराज देसाई(दादा) यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाव्दारे साधेपणाने होणार साजरा.

पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व पाटण तालुक्याचे युवा नेते मा.यशराज देसाई (दादा) यांचा दि. १0 ऑक्टोंबर,२०२1 रोजीचा वाढदिवस कोरोनाच्या संकटामुळे पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये मा.ना.श्री.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेवतीने विविध सामाजिक उपक्रमांनी साधेपणाने साजरा होणार आहे. दरम्यान वाढदिनी मा.यशराज देसाई (दादा) हे दुपारी 12.30 वा. पर्यंत दौलतनगर,ता.पाटण येथे धार्मिक विधीकरीता उपस्थित राहणार असून त्यानंतर ते कुटुंबियांसमवेत परगावी जाणार असल्याची माहिती शंभूराज युवा संघटनेचे अध्यक्ष भरत साळूंखे व शिवशाही सरपंच संघ पाटण विधानसभा अध्यक्ष विजय शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकात दिली आहे.

प्रसिध्दीपत्रकात पुढे म्हंटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व पाटण तालुक्याचे युवा नेते मा. यशराज देसाई (दादा) यांचा वाढदिवस गतवर्षी मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते, हितचिंतक यांचेकडून विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यंदाच्याही वर्षी कोरोनाचे संसर्गाचे पार्श्वभूमीवर यशराज देसाई (दादा) यांचे दि. १0 ऑक्टोंबर,२०२1 रोजीचे वाढदिवसा निमित्त पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली शिवसेना,युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये माहे जुलै महिन्यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबेघर, मिरगावं, ढोकवळे, हुंबरळी या गावांतील झालेल्या कुटुंबियांना जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप करण्यात येणार आहे.तसेच पाटण विधानसभा मतदारसंघातील तारळे, चाफळ, मल्हारपेठ, मारुलहवेली, नाटोशी, ढेबेवाडी, कुंभारगाव, काळगाव, कोयना व पाटण विभागामध्ये खाऊ वाटप तसेच गरीब व गरजू कुटुंबातील शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनींना वहया वाटप  युवासेना व युवा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत सामाजिक अंतर ठेऊन त्या त्या विभागामध्ये करण्यात येणार असून रविवार दि. १0 ऑक्टोंबर रोजी दौलतनगर ता.पाटण येथे धार्मिक विधीचे कार्यक्रम झाल्यानंतर ते दुपारी 12.30 वा. नंतर कुटुंबियांसमवेत परगांवी जाणार असल्याने मतदारसंघातील पदाधिकारी,कार्यकर्ते व हितचिंत यांनी प्रत्यक्ष न भेटता सोशल मिडीयाच्या माध्यमातून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्याव्यात,असे आवाहनही शेवटी प्रसिध्दीपत्रकांत करण्यात आले आहे.