महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त काकासाहेब चव्हाण कॉलेज येथे ऑनलाईन व्याख्यान संपन्न.

 

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,कोल्हापूर संचालित काकासाहेब चव्हाण कॉलेज,तळमावले ता पाटण, जि.सातारा सांस्कृतिक विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित - राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त ऑनलाईन महात्मा गांधीजींचे सत्य,अहिंसा व सत्याग्रह विषयक विचार या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.

यावेळी प्रमुख व्याख्याते प्रा.विशाल कांबळे ( राज्यशास्त्र विभाग, डी.के.एस.सी.कॉलेज, इचलकरंजी ), कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अरुण गाडे ( काकासाहेब चव्हाण कॉलेज , तळमावले ) यांची प्रमुख उपस्थित होती.

जगाला अहिंसा आणि शांतीचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त प्रथम विनम्र अभिवादन करण्यात आले. सत्याचे प्रयोग, सत्याग्रह, असहकार, सविनय , ग्रामस्वराज्य, पर्यावरण, सर्वधर्मसमभाव आदी अनेक विषयांवर महात्मा गांधीजींचे मौलिक विचार आजच्या बदलत्या काळात देखील सुसंगत असल्याचे दिसून येते. यासाठी गांधी जयंतीदिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाने महात्मा गांधीजींचे सत्य अहिंसा व सत्याग्रह विषयक विचार प्रा कांबळे सरांनी अभ्यासपुर्ण आपले परखड मौलिक विचार व्यक्त केले.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा महेश चव्हाण (प्रकल्प अधिकारी,रा.से.यो विभाग ) , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ गवराम पोटे ( सांस्कृतिक विभाग प्रमुख ) , कार्यक्रमाचे आभार प्रा.संभाजी नाईक ( प्रकल्प अधिकारी, रा.से.यो विभाग ) .

सदर कार्यक्रमास कॉलेज मधील व विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.