शिंगणवाडीचे सरपंच अपात्र,ग्रामसेवक यांची खातेनिहाय चौकशीअंती फौजदारी कारवाईचे आदेश.
ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
26 जाने.2020 ची ग्रामसभा घेण्याचे कायदेशीर बंधन असतांनाही ती घेतली नाही उलट 28 जाने.रोजी सभा घेऊन खोटे पुरावे तयार करून न्यायालयाचीच फसवणुक केल्याचे जिल्हाधिकारी यांच्या सुनावणीत स्पष्ट झाल्याने दोषी ठरलेल्या शिंगणवाडी ता.कराड चे सरपंचाना अपात्र करून ग्रामसेवक यांची चौकशी करून चौकशी अंती सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

       याबाबत तक्रारदार माजी सरपंच रवींद्र शिंगण यांनी दिलेल्या माहितीनुसार दि.26 जाने.2020 रोजी ग्रामसभा घेणे कायदेशीर बंधनकारक होते. मात्र शिंगणवाडीचे सरपंच विकास शिंगण व ग्रामसेविका संध्या माने यांनी ती सभा घेतली नाही मात्र दि.28 जानेवारी रोजी ग्रामसभा घेतली व ती 26 जानेवारी रोजी घेतल्याचे खोटे कागदपत्र तयार केले व तसा खोटा अहवाल गटविकास अधिकारी यांना सादर केला होता. 

     याबाबतची तक्रार मी गटविकास अधिकारी कराड यांच्या कडे सप्टेंबर 2020 मध्ये केली होती त्या तक्रारी वरून गटविकास अधिकारी यांच्या निर्देशानुसार व सहा.गटविकास अधि. श्रीमती साळुंखे व विस्तार अधिकारी पोतदार यांनी ग्रामपंचायत रेकार्ड ची तपासणी केली असता बोगस अहवाल दिला होता हे स्पष्ट झाले व तसा अहवाल त्यांनी गटविकास अधि. यांना दिला होता.

              याबाबत जिल्हाधिकारी यांच्यापुढे मार्च 2021 रोजी सुनावणी झाली होती.त्यात सरपंच व ग्रामसेवक दोषी आढळल्याने त्यांनी तक्रारदार यांचा अर्ज मान्य केला सरपंच विकास शिंगण यानाअपात्र करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी 1 आक्टो.2021रोजी दिलेल्या निर्णया नुसार सरपंच व ग्रामसेवक यांनी त्यांना नेमून दिलेल्या कर्तव्यात कसूर करून दप्तरात फेरफार करून बोगस पुरावे तयार करून न्यायालयाची दिशाभुल केली आहे. मुख्य कार्य.अधिकाऱ्यांनी संबधित ग्रामसेवक यांच्या वर शिस्त व अपील अधिनियमांतर्गत खाते कारवाई प्रस्तावित करून चौकशी अंती संबधित सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यात यावा असे म्हटले आहे.