केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचेकडून डाॅ.संदीप डाकवे यांचे कौतुक

‘‘अरे वा...खूपच छान...अभिनंदन...!’’ अशा शब्दांत केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांनी केले डाॅ.संदीप डाकवे यांचे कौतुक.

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड मध्ये तीनदा, हायरेंज बुक ऑफ वल्र्ड रेकाॅर्ड यामध्ये एकदा नाव नोंदवलेले पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील विश्‍वविक्रमवीर कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांचे मंत्री नितीन गडकरी यांनी कौतुक केले.

पुणे येथील एका कार्यक्रमादरम्यान डाॅ.डाकवे यांनी मंत्री नितीन गडकरी यांचे सुंदर रेखाचित्र त्यांना भेट दिले. ते दिल्यानंतर ‘‘अरे वा...खूपच छान...अभिनंदन...!’’ अशा शब्दांत त्यांनी डाॅ.संदीप डाकवे यांचे कौतुक केले तसेच त्यांनी डाॅ. डाकवे यांच्या कलेची व स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या उपक्रमांची माहिती घेवून त्यांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, डाॅ.संदीप डाकवे यांनी केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड, खा.हेमंत पाटील, सहकार परिशदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, किरण ठाकूर, श्रीराम पवार, भूषण करंदीकर, राजेंद्र हुंजे, प्रसन्न जोशी, राजश्री पाटील यांच्या नावातील अक्षरगणेशा त्यांना भेट दिले. यावेळी डाॅ.डाकवे यांच्यासमवेत राजेश निंबाळकर, सुयोग कुलकर्णी, किरण शिर्के, समीर करपे व अन्य मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट व डाॅ.संदीप डाकवे यांच्या कलेचे कौतुक करुन त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.