उदयसिंह चव्हाण यांना पाटण तालुका काँग्रेस उपाध्यक्ष पदाचे निवडीचे पत्र माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांचे हस्ते प्रदान.

कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

कुंभारगाव ता.पाटण येथील युवा नेते उदयसिंह चव्हाण यांना पाटण तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पदाचे निवडीचे पत्र माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. या निवडीबद्दल कुंभारगाव विभागात उदयसिंह चव्हाण यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 या वेळी इंद्रजित चव्हाण, मलकापूरचे उपनगराअध्यक्ष मनोहर शिंदे, सदस्य जिल्हा नियोजन समिती हिंदुराव पाटील, डॉ.सुरेश जाधव, सातारा जिल्हा महिला कॉग्रेस अध्यक्ष धनश्री महाडिक हे मान्यवर उपस्थित होते.