कोळेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी केले अनोखे स्वागत.


शाळेच्या प्रवेशद्वारावर दुतर्फा उभे राहून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करतांना कोळेवाडी जि.प.शाळेचा शिक्षकवृंद

ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
तब्बल 18 महिन्यानंतर सुरू झालेल्या जिल्हा परिषद शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्रवेश द्वारावर दोन्ही बाजूला उभे राहून विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्याचा कोळेवाडी जि.प. शाळेच्या गुरूजीनी केलेल्या अनोख्या उपक्रमाने विद्यार्थी मात्र भारावून गेले.विद्यार्थ्यांचे असे स्वागत फक्त जिल्हा परिषदेच्या शाळेतच होऊ शकते असे मत मुख्याध्यापक मोहन शिणगारे यांनी व्यक्त केले आहे.

         याबाबत कोळेवाडीचे मुख्याध्यापक मोहन शिणगारे यांनी सांगितले की गेल्या वर्षी 24 मार्च रोजी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शाळा बंदचा निर्णय शासनाने जाहीर केला होता.मधल्या काळात कोरोना साथीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत तब्बल 18 महिन्यापेक्षा जास्त कालावधी शाळा बंदच होत्या.आता कोरोना लाट ओसरल्यावर आज 4आँक्टो पासून शाळा सुरू होत आहेत.या काळात विद्यार्थ्यांना आँनलाईन शिक्षणाची सोय करण्यात आली असली तरी विद्यार्थ्यांच्या एकुण मानसिकते वर अनिष्ठ परिणाम होत होता,शिक्षणाची शाळेची ओढ व आवड कमी होत चालली होती मात्र शाळा पुन्हा सुरु झाल्याने विद्यार्थी खुष आहेत तर खरा आनंद शिक्षकांना झाल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.

      यावेळी मुख्याध्यापक मोहन शिनगारे, उपशिक्षिका शोभाताई चव्हाण, शुभांगी गुजर, प्रमोद गायकवाड,राजलक्ष्मी देशमुख,विद्याराणी पाटील रुक्सानाबी मुल्ला,संदिप कोरडे हे शिक्षक उपस्थित होते.

--------------------------------------------------------------

कोळेवाडी जि.प.शाळेचा विद्यार्थी स्वागताचा हा अनोखा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रेरणादायी आहे.

 रमेश देशमुख
 उपसभापती पं.स.कराड.
                             

---------------------------------------------------------------