चेंबूरमध्ये तरुणांना नोकरीच्या संधीसाठी मोफत मार्गदर्शन शिबिर

 


मुंबई |कृष्णाकाठ वृत्तसेवा:

 बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष आणि चेंबूरमधील वार्ड क्रमांक १५३ चे शिवसेनेचे कार्यसम्राट नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या अथक प्रयत्नाने तसेच अदानी फाउंडेशन व अदानी स्किल डेवलपमेंट सेंटरच्या माध्यमातून विभागातील तरुणांना माफक दरात प्रशिक्षण देऊन नोकरीची संधी मिळवण्याकरिता मोफत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रूशिन पटेल, संतोष लोणी, सोनाली देशमाने व प्रसाद कलमकर, चेंबूर विधानसभा संघटक अविनाश राणे, शिवसेनेचे वार्ड क्रमांक १५३ चे शाखाप्रमुख उमेश करकेरा, शिवसेना वॉर्ड क्रमांक १५३ च्या महिला शाखासंघटीका अनिता महाडिक, 

ज्येष्ठ समाजसेविका मिनाक्षी पाटणकर, सचिन खडतरे, युवासेना शाखा अधिकारी विनय शेट्ये व मान्यवर उपस्थित होते.