युवा नेते यशराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त काळगाव व कुंभारगाव विभाग शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न‌.


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
रक्ताची गरज जगभरात वाढत आहे हे आपण कोरोना काळात सर्वांनीच अनुभवले आहे.जो रक्तदान करतो तो भविष्यात कुणाचा तरी जीवनदाता बनलेला असतो.त्याने कुणाचा तरी जीव वाचविलेला असतो. रक्तदान हेच खरे सामाजिक कार्य समजून आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानून युवा नेते यशराज देसाई(दादा)यांच्या वाढदिवसानिमित्त काळगाव व कुंभारगाव विभाग शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न‌ झाले.
राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभुराज देसाई यांचे सुपुत्र व पाटण तालुक्याचे युवा नेतृत्व यशराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना काळगाव व कुंभारगाव गण यांच्या वतीने तळमावले येथे मर्चंट सिंडिकेट ग्रामीण बिगरशेती या संस्थेमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
        या रक्तदान शिबिरासाठी भागातील युवक व कार्यकर्ते एकत्र येऊन मोठ्या संख्येने 115 रक्तदात्यांनी रक्तदान केले. 
           या कार्यक्रमासाठी बाळासाहेब देसाई सह साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ दिलीपराव चव्हाण,पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई,मर्चंट सिंडिकेट चे चेअरमन अनिल शिंदे,शिवसेना तालुका प्रमुख राजेश चव्हाण ,शिवसेना तालुका उपप्रमुख सागर नलवडे, शिवदौलत बँकेचे संचालक मधुकर पाटील, विलास गोडंबे, माजी शिवसेना तालुका प्रमुख तानाजी चाळके,विनायक डुबल, विशाल पवार, कॉन्ट्रॅक्टर सचिन यादव,विक्रम यादव, सुरज पाटील अधिक करपे,गोविंद गोटुगडे ,ओंकार शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.