चेंबूरमधील साईधाम रहिवाशी संघाचे नवरात्रीत भव्य रक्तदान शिबिर संपन्न


मुंबई |कृष्णाकाठ वृत्तसेवा : रक्ताची गरज जगभरात वाढत आहे हे आपण कोरोना काळात सर्वांनीच अनुभवले आहे.जो रक्तदान करतो तो भविष्यात कुणाचा तरी जीवनदाता बनलेला असतो.त्याने कुणाचा तरी जीव वाचविलेला असतो. रक्तदान हेच खरे सामाजिक कार्य समजून आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानून चेंबूरमधील घाटले गावातील अरविंद पाटील वाडीतील साईधाम रहिवाशी संघ या नामांकित सामाजिक संस्थेने नवरात्र उत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. 

या रक्तदान शिबिराचे उदघाटन बेस्ट चे माजी अध्यक्ष आणि वार्ड क्रमांक १५३ चे नगरसेवक अनिल पाटणकर, गोवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल हिरे,समाजसेविका मीनाक्षी पाटणकर,चेंबूरचे प्रसिद्ध डेकोरेटर भूषण पाटील आणि नवाकाळचे उपसंपादक शंकर कडव यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक आमदार प्रकाश फातर्पेकर यांची उपस्थिती मोलाची ठरली. त्याचप्रमाणे यावेळी स्थानिक उद्योगपती सुरेश परमार , उद्योगपती रमेश परमार, शिवसेनेचे उपशाखा प्रमुख राजेंद्र चव्हाण, युवा सेनेचे वॉर्ड क्रमांक १५३ चे उपशाखा अधिकारी सनी सिंह तसेच गटप्रमुख बाळू नानेकर, पोलीस हवालदार राजेंद्र घोरपडे आणि प्रफुल्ल खानविलकर आदी मान्यवर या शिबिरास उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे अटक संयोजन साईधाम रहिवासी संघ या संस्थेचे अध्यक्ष भास्कर चव्हाण,सरचिटणीस तानाजी गायकवाड,

उपाध्यक्ष रत्नाकर गुरव, सहखजिनदार सौरभ राणे, सहचिटणीस तुषार नवेले आणि दुर्गेश माटल,नयन कोटकर, गजानन हंबीर, नरेंद्र सोलकर, नितीन पाटील, मिलिंद पाटील तसेच इतर सर्व पदाधिकारी, सदस्य आणि विशेषतः महिला मंडळाने विशेष मेहनत घेऊन केले होते.या शिबिराला रक्तदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला.