स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांचे कार्य सैनिक स्कूलमधील विद्यार्थ्यांना समजले पाहिजे : खा.श्रीनिवास पाटील


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांनी देशातील पहिल्या सैनिक स्कूलची स्थापना आपल्या सातारा येथे केली. तर देशाचे संरक्षण मंत्री म्हणूनही त्यांनी स्व.पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोपविलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. त्यांचे कार्य या सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्या पर्यंत पोहचले पाहिजे असे उद्गार खा.श्रीनिवास पाटील काढले.

     सातारा सैनिक स्कूल संदर्भात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व शाळा व्यवस्थापन यांची ऑनलाईन बैठक सोमवारी पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते.

    खा.श्रीनिवास पाटील म्हणाले, या भूमीचे सुपुत्र स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांचे अनेक क्षेत्रांत कार्य मोठे आहे. त्यांच्या कार्याची माहिती नव्या पिढी समोर यायला हवी. चव्हाण साहेबांनी देशातील पहिल्या सैनिक स्कूलची स्थापना सातारा येथे केली. तर देशाचे संरक्षण मंत्री म्हणून देखील त्यांनी आपली जबाबदारी सक्षमपणे संभाळली. त्यांनी दिलेल्या योगदानाची माहिती सैनिक स्कूलमधील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली पाहिजे. यासाठी त्यांच्या कार्याचा मागोवा घेणारा सचित्र असा धातूच्या स्कल्पचर्सचा देखावा या शाळेत उभारण्यात यावा. तसेच शाळेचा दर्शनी फलक सुंदर व आकर्षक असावा. त्यानुसार त्यामध्ये बदल करण्यात यावा. 

    सैनिक स्कूलच्या विकासासाठी महाविकास आघाडी सरकारने 300 कोटी रुपयांच्या भरीव निधीची तरतूद केली आहे. तशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली असून सैनिक स्कूल प्रशासनाने येणाऱ्या निधीचा वापर काटेकोर व योग्य प्रकारे करावा. स्कूलमध्ये मुलींसाठी वसतिगृहाची इमारत बांधली जात आहे. त्यामध्ये मुलींना विशेष सोयीसुविधा देणारी व्यवस्था असावी. तसेच इंडोअर जिमन्याशिअम साठी व्यवस्था करण्यात यावी. सौर ऊर्जा निर्मिती करून शाळेतील प्रकाश व्यवस्थेसाठी जेकरणे शक्य आहे त करावे . यावरही जरूर कार्यवाही व्हावी म्हणजे शाळेवरील वीज बिलाचा भार कमी होईल. अशा सूचना खा. पाटील ज्ञयांनी केल्या.

    या बैठकीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, डॉ.अशोकराव कारंडे, झुंजारराव पाटील, सैनिक स्कूलचे प्राचार्य उज्वल घोरपडे, निवृत्त मेजर जनरल विजय पिंगळे, उच्च माध्यमिक शिक्षण विभाग पुणेचे संचालक ए.के.सिंग हे उपस्थित होते.