ब्रिलियंट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे आर्किटेक्चर परीक्षेत घवघवीत यश.


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
ब्रिलियंट अकॅडमी ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कराडच्या विद्यार्थ्यांनी जईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत अतिशय उज्ज्जल यश संपादन केले आहे. वसुंधरा पिसाळ या विद्यार्थीनीने ९९.९२ पर्सेंटाइल मिळवून ऑल इंडिया रँक ६४ मिळवली आहे. प्रतिक्षा थोरात हिने ९९.८० टक्के पर्सेंटाइलसह ऑल इंडिया रँक ११५ मिळवली आहे. प्रेरणा तेली हिने ९५ टक्के पर्सेंटाइल, सुरभी थोरात हिला ८५ पर्सेंटाइल मिळाले आहेत. ८० पर्सेंटाइलच्या पुढे दहा विद्यार्थी आहेत. त्यांचा एस.पी.ए. मधील प्रवेशाचा मार्ग निश्चित झाला आहे. या यशाबद्दल कॉलेजच्या प्रिन्सिपल सौ. रुपाली मोहन पाटील, संस्थेचे अध्यक्ष मोहन वसंतराव पाटील, संस्थेचे सचिव व अकॅडमीचे डायरेक्टर आदित्य रंजनसर व केमेस्ट्री एचओडी निलेश कुमार अगरवाल, जितेंद्र सर, कुमाबत सर, स्वप्नील थोरात, अमरन सिंग, खांबोरकर मॅडम यांनी अभिनंदन केले. आर्किटेक्चर क्षेत्रात जेईई पेपर २ व नाटा या दोन परीक्षा असून   त्यांच्या तयारीसाठी ब्रिलियंट अकॅडमी ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कराड येथे अतिशय उत्तम सोय असून स्वतंत्र बॅच चालवली जाते. विद्यार्थ्यांची वैयक्तिक क्षमता लक्षात घेवून त्याच्या आवडीच्या क्षेत्रात करीयर करण्याची संधी मिळावी म्हणून ब्रिलियंट कॉलेज तर्फे जेईई, नीट, आर्किटेक्चर, एन.डी.ए, एम.एच. टी. सीईटी इ.स्वतंत्र बॅचेस चालवल्या जातात.