गोरखगड पाठोपाठ सह्यपुत्रांची हरिश्चंद्रगडाची मोहीम फत्ते.

 

कोल्हापूर | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
'गोरखगड' च्या यशस्वी मोहिमे नंतर ठाणे, पुणे आणि अमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या हरिश्चंद्रगडावर, सह्यपुत्र trek and travels या संस्थेने अभ्यास मोहिमेचे आयोजन दिनांक १० ऑक्टोबर रोजी केले होते. या मोहिमेस पुणे, मुंबई तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून सह्यपुत्र सहभागी झाले होते. रविवारी पहाटे ०४:०० वाजता दुर्ग भ्रमंती सुरु करुन हरिश्चंद्रेश्वरमंदिराच्या प्रांगणात सकाळी ०८ वाजता पोहोचले. तसेच अहमनगर जिल्ह्यातील उंच शिखरांपैकी एक व गडावरील महत्वाचे शिखर असणाऱ्या कोकण कड्यावर हरिश्चंद्रगडाचा इतिहास व्याख्याते प्रा. नवनीत यशवंतराव यांनी आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून उपस्थितांना ऐकवताना, त्यांनी सह्याद्रीचे महत्व अधोरखित केले तसेच गडावरील स्थापत्य शास्त्राचा, जीवशास्त्राचा आपण अभ्यास करायला हवा असे आवाहन केले. त्या नंतर कोकणकड्यावर चहा नाश्ता देण्यात आला व मोहीम संपन्न झाल्यावर सर्वांचे भोजन झाले. या मोहिमेचे आयोजन सह्यपुत्र संस्थेचे अनिकेत शेलार, नितेश भेरे, प्रणित भेरे, अंकिता शिंदे, विशाल भेरे यांनी केले होते.


आमच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी सांगितले," सह्याद्री पर्वताच्या आसमंतात राहणारा प्रत्येक युवा हा 'सह्यपुत्र' आहे. आणि या सह्याद्रीचे आपण देणे लागतो म्हणुनच ' सह्यपुत्र trek and travels' स्थापन करुन केवळ ट्रेक न करता अभ्यास मोहिमांचे आयोजन प्रत्येक आठवड्यात महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवर केले जाते. या मोहिमेत अर्धे सह्यपुत्र हे प्रथमताच ट्रेक करणारे होते त्यांनी देखील उत्तम कामगिरी बजावली. पुढील आठवड्यात दिनांक १७ ऑक्टोबर रोजी माळशेज घाटात उगम पावणाऱ्या काळू नदीच्या उगम स्थाना पर्यंत जंगल सफारी चे आयोजन करण्यात आले आहे." इच्छुकांनी नक्की संपर्क करा असे आवाहन सह्यपुत्रच्या टीम ने करतांना त्यांच्या Instagram वरील @sahyputra_ या account वर संपर्क करावा असे सांगितले.