श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये रब्बी पीक नियोजन कार्यशाळा संपन्न.


उंडाळे | कृष्णाकाठ वृत्तसेवा
श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी, घोगाव व कृषी विज्ञान केंद्र, कालवडे यांच्या संयुक्त विद्यमाने रब्बी पीक नियोजन ह्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. भरत खांडेकर वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र कालवडे व विशाल महाजन विस्ताराधिकारी, कृषी केंद्र कालवडे हे उपस्थित होते.

विशाल महाजन यांनी कृषी विज्ञान केंद्र कालवडे यांच्या मार्फत घेण्यात येणारे भारत सरकारचे शेतीपूरक उपक्रम व स्वच्छता अभियान याबद्दल माहिती दिली तर डॉ.भारत खांडेकर यांनी रब्बी पिके हरभरा, ज्वारी, गहू, सोयाबीन यांची माहिती दिली. रब्बी पिक उत्पन्नवाढीबद्दल माहिती देताना माती व पाणी परीक्षण, पिकांना योग्य प्रमाणात खताची गरज, पाण्याचे नियोजन व औषध फवारणी ह्या बाबतीत मार्गदर्शन केले. पिकांवर होणाऱ्या विविध रोगाबद्दल व त्यावर गुणकारी औषधाबद्दल माहिती दिली व डॉ.खांडेकर यांनी उपस्थित शेतकरी वर्गाच्या शंकाचे निरसन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत शेवाळे यांनी केले व आभार प्रदर्शन प्राध्यापिका गायत्री सुर्यवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. बेलवोटगी व प्रा. संदीप पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक शशिकांत पाटील, सेक्रेटरी प्रसून जोहरी आणि प्राचार्य डॉ. विजयानंद अरलेलीमठ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.