विहे येथे दुचाकीच्या अपघातात एकजण जागीच ठार


पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
कराड-पाटण मार्गावर विहे गावच्या हद्दीत रस्त्याच्या संरक्षण कठड्याला जोराची धडक बसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर एकजण जखमी झाला आहे. गुरुवारी सकाळी ९.३० च्या सुमारास झालेल्या या अपघाताची नोंद मल्हारपेठ पोलीस ठाण्यात झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कराड येथील शुभम आप्पा डिसले व ओंकार चंद्रकांत पाटील (वय १५) हे दुचाकीने कराडहून पाटणच्या दिशेने जात होते. विहे गावच्या हद्दीतील स्मशानभूमीजवळ कराड-पाटण राज्यमार्गावरील संरक्षक कठड्याला दुचाकीची जोरदार धडक झाल्याने शुभम डिसले या युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर ओंकार पाटील हा जखमी झाला आहे. शुभम याचे येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंकुशे करत आहेत.

Popular posts
लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून उद्या कराड तालुक्यात बंदची हाक.
इमेज
कुंभारगाव, चाळकेवाडी परिसरात वन्यप्राण्यांकडून शेळीवर हल्ला. दोन शेळ्यांचा घेतला जीव.
इमेज
युवा नेते यशराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त काळगाव व कुंभारगाव विभाग शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न‌.
इमेज
गोरखगड पाठोपाठ सह्यपुत्रांची हरिश्चंद्रगडाची मोहीम फत्ते.
इमेज
स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांचे कार्य सैनिक स्कूलमधील विद्यार्थ्यांना समजले पाहिजे : खा.श्रीनिवास पाटील
इमेज