चाळकेवाडी ता पाटण येथे 100 KW डीपीचे उदघाटन.

 


कुंभारगाव|कृष्णाकाठ वृत्तसेवा:       

 कुंभारगाव ता पाटण येथून जवळच असणाऱ्या चाळकेवाडी येथे गृहमंत्री ना. शंभूराज देसाई साहेब यांच्या डोंगरी विकास निधीतून 21 पोल, मेन लाईन,100 KW डीपीचे उदघाटन बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ‌ दिलीपराव चव्हाण यांचे हस्ते करण्यात आले. 

              यावेळी बोलताना ते म्हणाले साहेबांच्या मूळे तातडीने ही नवीन लाईन व डीपी चे काम पूर्ण झाले. चाळकेवाडी स्म्शानभूमी येथे 10, गणपती मंदिर येथे 7, तामजाई मंदिरा पर्यंत 4, असे एकूण 21, पोल उभे करून नवीन लाईन 100 KW, डीपी चा शुभारंभ संपन्न झाला. ‌ यामुळे येथील ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली आहे. 

              यावेळी चाळकेवाडी सरपंच नंदा चाळके, उपसरपंच भरत चाळके, शिवसेना माजी तालुका उपप्रमुख तानाजी चाळके, सुंदर चाळके, अशोक चाळके, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.