चेंबूरमध्ये प्रथमच रक्तदान शिबीराचे उदघाटन व आरतीचा मान तृतीयपंथीला

मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रुग्णांना रक्तपुरवठा यासाठी छत्रपती शिवाजी सेवा मंडळ,गोवंडी पोलीस ठाणे व निब्बाण सामाजिक शैक्षणिक संस्था(नेस्ट सेव)च्यावतीने चेंबूर खारदेवनगर घाटला व्हिलेज येथे गणेशोत्सव मंडपात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन प्रथमच तृतीयपंथीयांच्या किन्नर माँ संस्थेच्या अध्यक्षा सलमा खान यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पोलीस निरीक्षक कोयंडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद भोसले यांनी  श्रीफळ वाढविला.यावेळी प्रथमच रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्याचा मान सलमा खान यांना देण्यात आला तसेच वाजतगाजत फटाक्यांच्या आतिषबाजित त्याचे स्वागत  करण्यात आले. अशाप्रकारे प्रथमच कीन्नर  समाजाला मिळालेल्या बहुमानामुळे सलमा खान भारावुन गेल्या आयोजक व मंडळाचे अध्यक्ष  राजेंद्र नगराळे  यांनी तृतीयपंथी समाजातील व्यक्तीचे अनोख्या पध्दतीने प्रथमच  केलेल्या  या स्वागतामुळे हा कुतुहलाचा विषय बनला होता. कोरोना  नियमांचे पालन करीत पोलीस अधिकारी, पोलीस, युवक व महिलांनी या रक्तदान शिबिरात हिरीरीने सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाला समाजसेविका किन्नर हर्षा तुरे,पोलीस  व समाजसेवक राजेंद्र घोरपडे, लोकमान्य  टिळक रुग्णालयाचे रक्तपेढी प्रमुख राहुल बल्लाळ, डॉकटर, स्टाफ, नाट्य निर्माते अशोक शिगवण, अभिनेते मनोज कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेस  मुंबई उपाध्यक्षा कुमुद जयकर, तालुका अध्यक्ष दीपक सावंत, नगरसेवक अनिल पाटणकर, विभाग प्रमुख  अविनाश राणे , अनिता महाडीक भाजपचे अनिल बेनीवाल, काँग्रेस चे नितेश शिरसाट, विजयसींग ठाकूर ,स्टीफन  नाडर यांचे

 छत्रपती शिवाजी सेवा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र नगराळे व निब्बाण सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा स्वानंदी तांबे  यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले.

श्री कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट चे दशरथ यादव, हेमंत झाला ,संदिप खापरे , चंद्रकांत डोळसे ,अनिल भानत गोवंडी पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद केंजळे यांनी केले तर जितेंद्र घोणे,अजिंक्य काळे, प्रथमेश कापसे,सुशांत अवघडे व पदाधिकारी यांनी हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.