पाटण तालुका युवक काँग्रेस कार्यकारीणीची निवड जाहिर ; तालुका अध्यक्षपदी नरेंद्र पाटणकर यांची फेरनिवड तर उपाध्यक्षपदी जगदीश पाटील व उदयसिंह चव्हाण यांना संधी.

ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

सातारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी पाटण तालुका युवक काँग्रेस कार्यकारीणीची निवड जाहिर केली असून त्यामध्ये दिवशीच्या नरेंद्र पाटणकर यांची तालुकाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्षपदावर सुपने ता.कराड येथील जगदीश पाटील आणि कुंभारगाव येथील उदयसिंह चव्हाण अशा दोघांना संधी देण्यात आली आहे.

     याशिवाय जिल्हा काँग्रेसने जाहीर केल्यानुसार कार्यकारिणीवर सरचिटणीस म्हणून मयुरेश साळुंखे, मयूर वनवे, स्वप्नील पवार, सागर चव्हाण, तौफिक पटेल तर तालुका चिटणीसपदावर अक्षय घाडगे, निरंजन धस, सुभाष माने, रोहित चव्हाण,योगेश काकडे,मारुती शेलार यांना संधी दिली आहे.

         कार्यकारिणी सदस्य म्हणून परशुराम पवार, रमेश शेलार,रमेश साळुंखे,जमीर डांगे,रोहित माने, विनोद घाडगे,सचिन साळुंखे,जयदिप कदम, तुषार कांबळे,अक्षय सुतार,प्रशांत पालकर यांच्या निवडी जाहिर करण्यात आल्या आहेत. 

      युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीवर निवड झाल्या बद्दल अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस व चिटणीस व सर्व कार्यकारिणी सदस्यांचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.सुरेश जाधव, नियोजन समितीचे सदस्य हिंदुराव पाटील,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग यादव जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांच्या हस्ते व उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.