पाटण तालुका महिला कॉंग्रेस आघाडीच्या निवडी जाहीर. तालुकाअध्यक्षपदी वंदनाताई आचरे यांची फेरनिवड तर उपाध्यक्षपदी सारिका शिंदे यांची निवड‌

 

वंदनाताई आचरे- अध्यक्षा पाटण तालुका महिला काँग्रेस.
सारिका शिंदे - उपाध्यक्षा पाटण तालुका महिला काँग्रेस.

ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
 सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने पाटण तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या निवडी जाहिर करण्यात आल्या आहेत. तालुका अध्यक्षपदी वंदनाताई आचरे (आचरेवाडी काळगांव)यांची फेर निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी सारिका शिंदे (कोरिवळे )यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

            सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा यांनी निवडलेली तालुका महिला काँग्रेस कार्यकारिणी तालुकाअध्यक्षा वंदनाताई आचरे, उपाध्यक्षा सारिका शिंदे,चिटणीस शकुंतला पाटील, खजिनदार अनिता घाडगे,व कार्यकारिणी सदस्य म्हणून सुरेखा काळे,प्रियांका कुंभार,शालन जाधव, रंजना शिंदे,कल्पना निकम,सुलोचना परीट,अस्मिता पवार,सुनिता साबळे,मनिषा साळुंखे,यांच्या निवडीची घोषणा करण्यातआली आहे.

       नवनिर्वाचित कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्यांच्या निवडीनंतर माजी मुख्यमंत्री आम. पृथ्वीराज चव्हाण,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य हिंदुराव पाटील,जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव,काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष पांडुरंग यादव,काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई,जिल्हा काँग्रेस कमिटीचे सदस्य अभिजित पाटील,यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.