उंडाळेत आढळले दुर्मिळ अटलास मोथ फुलपाखरू

उंडाळे : येथे आढळलेला अटलास मोथ जातीचा दुर्मिळ पतंग.
(छायाचित्र : जगन्नाथ माळी, उंडाळे)

उंडाळे | कृष्णाकाठ वृत्तसेवा : उंडाळे येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर माध्यमिक विद्यालयाच्या बागेमध्ये 'अटलास मोथ' जातीचे दुर्मिळ फुलपाखरू (पतंग) आढळले आहे. आपल्याकडे आढळणाऱ्या फुलपाखरा पेक्ष्या हे खूपच मोठे असल्याने ते पाहण्यासाठी गर्दी झाली होती. 

या पतंगा विषयी माहिती देताना अभ्यासक श्री. माने म्हणाले Atlas moth हे आशिया खंडातील जंगलात आढळणारे मोठे पतंग आहे. याचे पंख 24 cm पर्यत असतात आणि पंखांच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ सुमारे 160 cm पर्यत असते. यातील मादी नरापेक्षा मोठी असते. तर नराचे अँटेना मोठे असतात. मादी नरांना आकर्षित करण्यासाठी फेरोमोन सोडतात. नर त्यांच्या अँटेनावर असलेल्या केमोरेसेप्टर्सचा वापर करून कित्येक किलोमीटर अंतरावरून हा फेरोमोन शोधू शकतात. मादी फलित झाल्यावर झाडांच्या पानाखाली 2.5 mm आकाराची गोलाकार अंडी देते. याचे आयुष्य एक ते दोन आठवड्याचे असते. याची मादी अंडी दिल्यानंतर मरते. दोन आठवड्यानंतर अंड्यातून धुळसर हिरव्या रंगाचे सुरवंट जन्म घेतात आणि लिंबू, पेरू, दालचिनी यासारख्या सदाहरित झाडांवर अन्न खातात. सुरवातीला अंड्याचे कवच हे त्यांचे अन्न असते. सुरवंटांची लांबी 11cm व जाडी 2.5cm पर्यत वाढू शकते. यानंतर हे पाने व रेशीम पासून बनवलेल्या कोकून मध्ये जातात. कोकून मधून अंदाजे चार आठवड्यानंतर पतंग बाहेर पडतात. ऊर्जा वाचवण्यासाठी पतंग रात्री संचार करतात व दिवसा आराम करतात. त्यांच्याकडे पूर्णतः तयार झालेले मुख नसल्यामुळे, मोठे पतंग खाऊ शकत नाहीत, अळीच्या अवस्थेत असताना जमा झालेल्या चरबीच्या साठ्यावर ते पूर्णपणे टिकून राहतात. ते फक्त काही दिवस जगतात व जोडीदार शोधणे हा त्यांचा एकमेव उद्देश असतो. हे प्रामुख्याने आशिया खंडातील कोरड्या व उष्णकटिबंधीय जंगलात आढळते. हॉंगकॉंग मध्ये याला सापाच्या डोक्याचे पतंग म्हणून पण ओळखतात.             भारतात यापासून गैर व्यावसायिक रेशीम बनवले जाते. तसेच तैवान मध्ये याचे कोकून पर्स म्हणून वापरले जातात. हे फुलपाखरू सकाळी संजय पाटील यांना दिसले. यावेळी प्राचार्य बी. आर पाटील, हरित सेना समन्वयक जगन्नाथ माळी. आदी शिक्षक उपस्थित होते.