मालदनचे युवा शेतकरी विजय काळे आज सातारा आकाशवाणीवर

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

पाटण तालुक्यातील मालदन येथील युवा शेतकरी विजय काळे यांची सातारा आकाशवाणी केंद्रावर किसानवाणी या कार्यक्रमात आज गुरुवार दि.23 सप्टेंबर, 2021 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता मुलाखत होणार आहे. गांडूळ खत निर्मिती या विषयावर ते संवाद साधणार आहेत. विजय काळे यांनी मालदन येथे आपल्या कुटूंबिय, मित्र मंडळी व कृषी अधिकारी यांच्या सहकार्यातून गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प उभा केला आहे. परिसरातील लोकांना तो आदर्शवत असा आहे. त्यांची ही मुलाखत भागातील सर्वांनी ऐकून त्यांना अभिप्राय कळवावा.

युवा शेतकरी विजय काळे यांची सातारा आकाशवाणीवर मुलाखत हा सर्व पाटणवासियांसाठी अभिमानाचा क्षण आहे.

Popular posts
कुंभारगांव येथील संदीप देवळेकर यांचे दुःखद निधन .
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
इमेज
न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन.
मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने केली पाहणी.
इमेज