मुंबईकरांच्या मूलभूत हक्कांसाठी भाजपचा चेंबूर पालिका कार्यालयावर भव्य मोर्चा


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : चेंबूर खड्डेमुक्त करा, ५०० फूट सदनिकांचा मालमत्ता कर माफ करा ,अतिवृष्टीग्रस्तांना नुकसान भरपाई द्या व इतर मूलभूत हक्कांच्या मागणीसाठी भाजपा चेंबूर मंडळाचे अध्यक्ष राहुल वाळंज यांच्या मार्गदर्शनाखाली आज चेंबूर एम पश्चिम पालिका कार्यालयावर बहुसंख्य भाजप कार्यकर्त्यांसह भव्य शांतता मोर्चा काढला.

या मोर्चाचे नेतृत्व भाजपा दक्षिण मध्य मुंबई जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा व नगरसेविका आशा मराठे , प्रभाग समिती अध्यक्ष महादेव शिवगण , नगरसेवक सुषम सावंत , राजेश फुलवारीया , वॉर्ड अध्यक्ष अनिकेत चव्हाण, राजेश ठाकूर,सचेतन पोसम, मुकुंद निकम , शशिकला टांकसाळ आणि सुभाष मराठे आदींनी केले. यावेळी नगरसेविका आशा मराठे यांनी पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी मुंबईकरांच्या या मूलभूत समस्यांवर ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर मुंबईतील रस्त्यावर उतरून मुंबईचा चक्का जाम केला जाईल असा इशारा दिला.