चेंबूरमधील मलेरिया जनजागृती मोहिमेत नगरसेवक पाटणकर सहभागी


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : पावसाळ्यात होणारे डेंग्यू, मलेरिया सारखे आजार लक्षात घेऊन बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष आणि चेंबूरमधील वॉर्ड क्रमांक १५३ चे लोकप्रिय नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या सुचनेनूसार मुंबई महापालिकेच्यावतीने चेंबूरच्या विभागात धूर फवारणी, ड्रममधे औषध टाकणे, डेंग्यू मलेरिया चे आळ्या सोधणे व डेंग्यू मलेरियावर जनजागृती करण्यासारखी विशेष मोहीम राबविण्यात आली.विशेष म्हणजे नगरसेवक अनिल पाटणकर हे स्वतः या मोहिमेत सहभागी होऊन परिसरात फिरताना दिसत होते.

ही मलेरिया जनजागृती मोहीम राबविताना स्वतः नगरसेवक अनिल पाटणकर यांच्यासह शाखाप्रमुख उमेश करकेरा, महिला शाखा संघटीका अनिता महाडिक, समाजसेविका मिनाक्षी पाटणकर,शिवसेना वॉर्ड क्रमांक १५३ चे कार्यालयप्रमुख मारूती वाघमारे, मुंबई महापालिका आरोग्य विभाग, घनकचरा विभाग व पिसीओ विभाग चे सर्व अधिकारी व कर्मचारी व शिवसेना महिला, पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts
लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून उद्या कराड तालुक्यात बंदची हाक.
इमेज
कुंभारगाव, चाळकेवाडी परिसरात वन्यप्राण्यांकडून शेळीवर हल्ला. दोन शेळ्यांचा घेतला जीव.
इमेज
युवा नेते यशराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त काळगाव व कुंभारगाव विभाग शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न‌.
इमेज
गोरखगड पाठोपाठ सह्यपुत्रांची हरिश्चंद्रगडाची मोहीम फत्ते.
इमेज
स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांचे कार्य सैनिक स्कूलमधील विद्यार्थ्यांना समजले पाहिजे : खा.श्रीनिवास पाटील
इमेज