दै.कृष्णाकाठच्या आरती संग्रहाचे प्रस्काशन करताना खा.श्रीनिवास पाटील व इतर मान्यवर.
संपादक चंद्रकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दै.कृष्णाकाठ यशस्वी वाटचाल करत आहे. कोरोना महामारीच्या काळात कोरोना रुग्णांच्या अचूक आकडेवारी व माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. त्यामुळे कृष्णाकाठ च्या बातमीची आतुरता वाचकांमध्ये कायम आहे. याच कृष्णाकाठ ने वेळोवेळी विविध विशेषांक प्रकाशित केले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत चव्हाण यांनी पत्रकार डॉ. संदीप डाकवे, यशराज चव्हाण, राजेंद्र पुजारी व अन्य सहकारी यांच्या मदतीने सुंदर आरतीसंग्रह तयार केला होता. याचे प्रकाशन विविध ठिकाणी गणेशोत्वाच्या कालावधीत मान्यवरांनी केले आहे. सर्व मान्यवरांनी कृष्णाकाठ गणेश आरती संग्रहाचे विशेष कौतुक केले.
डॉ. संदीप डाकवे यांनी साकारलेले मुखपृष्ठ खूप बोलके व दर्जेदार आहे. गणपती बाप्पा दैनिक कृष्णाकाठचा अंक वाचत आहेत असे मुखपृष्ठ बनवून आरती संग्रहाची शोभा वाढवली. हे विलोभनीय चित्र सर्व मान्यवर व वाचकांना अतिशय आवडले व भावले देखील. संपूर्ण आरती संग्रह ची मांडणी सुरेख व देखणी झाली आहे अशा शब्दात सर्व मान्यवरांनी आरती संग्रह चे विशेष कौतुक केले.
कृष्णाकाठ आरती संग्रहाचे प्रकाशन करताना ना.शंभूराज देसाई व इतर मान्यवर.
____________________________________
सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांनी कृष्णाकाठ गणेश आरती संग्रह पुस्तकाचे गणेशोत्सव काळात प्रकाशन केले. आरती संग्रह पाहिल्यानंतर त्यांनी कृष्णाकाठ चे संपादक चंद्रकांत चव्हाण व त्यांच्या टीमचे भरभरून कौतुक केले. पुस्तकाचे मुखपृष्ठ, आरत्या, जाहिराती संपूर्ण पुस्तकाची दर्जेदार मांडणी याबद्दल कौतुक केले व खास पत्र पाठवून अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या पत्रातील त्यांच्याच शब्दातील अनोख्या शुभेच्छा खास कृष्णाकाठ वाचकांसाठी.
____________________________________

____________________________________