मल्हारपेठ येथे हॉटेलची तोडफोड : तक्रार दाखल

 

निसरे विहीर येथील श्रद्धा हॉटेलची करण्यात आलेली तोडफोड.

पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
निसरे विहीर, ता. पाटण येथील श्रध्दा हॉटेलमध्ये घुसून हॉटेलची तोडफोड करून मोठ्या प्रमाणात नुकसान करत शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी मल्हरापेठ ता. पाटण येथील अमर शरद भिसे याच्यासह अन्य दोघांविरोधात हॉटेलचे मालक श्रीकांत विश्वास बामणे यांनी मल्हारपेठ पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत मल्हारपेठ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निसरेविहीर येथे श्रीकांत विश्वास बामणे यांच्या मालकीचे श्रध्दा हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये बुधवार दि. 22 रोजी सायंकाळी अमर शरद भिसे याच्यासह अन्य काहीजणांनी प्रवेश करत हॉटेलची तोडफोड केली. सीसीटिव्ही कॅमेऱ्याची मोडतोड केली. तसेच शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकीही दिली, असे मल्हारपेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी मल्हारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास मल्हारपेठचे सपोनि उत्तम भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अंकुशी करत आहेत.

Popular posts
कुंभारगांव येथील संदीप देवळेकर यांचे दुःखद निधन .
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
इमेज
न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन.
मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने केली पाहणी.
इमेज