दूरदर्शनवरील मुलाखतीबद्दल डाॅ.संदीप डाकवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
दूरदर्शन सहयाद्री वाहिनीवर ‘विचारांच्या पलीकडले’ या कार्यक्रमात झालेल्या विशेष मुलाखतीमुळे पाटण तालुक्याचा अभिमान ठरलेले डाॅ.संदीप डाकवे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून, फोनव्दारे, मेसेजव्दारे डाॅ.डाकवे यांच्या कर्तृत्वाचे मनापासून कौतुक केले आहे.

धामणी (ता.पाटण) येथील श्री विठ्ठल रखुमाई उत्सव मंडळ यांच्यावतीने सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देवून डाॅ.संदीप डाकवे यांचा सत्कार नरेंद्र पाटील (चेअरमन,अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशन) यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी फौजी आनंदा दिंडे, सरपंच आशाताई नेर्लेकर, संजय सावंत, अनिल दिंडे, दिपक दिंडे व मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.



श्री रामकृपा विकास मंडळ, रामनगर धामणी यांनी शाल, श्रीफळ देवून डाॅ.संदीप डाकवे यांचा सत्कार विविध मान्यवरांच्या उपस्थितीत केला. या प्रसंगी सारंग पाटील (प्रदेशाध्यक्ष, माहिती व तंत्रज्ञान राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी, महाराष्ट्र राज्य), योगेश पाटणकर (अध्यक्ष, राजे संघर्ष प्रतिष्ठान), प्रतापराव देशमुख (उपसभापती, पं.स.पाटण), राजाभाऊ काळे (सदस्य, जिल्हा नियोजन समिती सातारा), मारुती मोळावडे (अध्यक्ष, जनसहकार निधी लिमिटेड), सौ.संगिता पुजारी (माजी सभापती, पं.स.पाटण), बाजीराव सावंत (माजी सरपंच, ग्रां.पं.धामणी), शितल पाटील(सदस्या, ग्रां.पं.धामणी), दिंडे महाराज व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन समाजसेवक सचिन जयवंत सावंत यांनी केले होते.

सुभेदार जगन्नाथ शिद्रुक यांनी मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व पुस्तक देवून डाॅ.संदीप डाकवे यांचा सन्मान केला. यावेळी मेजर पांडूरंग उदूगडे, प्रा.दादाराम साळुंखे, प्रा.ए.बी.कणसे, सपोनि संतोश पवार, महादेवराव पानवळ, रघुनाथ मानुस्करे, लेखक शिवाजी मस्कर, फौजी विष्णू चव्हाण, संजय सावंत, संतोष करपे व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन विजयराव पाचुपते यांनी केले.

चाळकेवाडी (कुंभारगांव) येथील बाल गणेश मंडळा तामजाई वार्ड वतीने देखील डाॅ.संदीप डाकवे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष मारुती निवडूंगे, गणेश डोंबे, विघ्नेश डोंबे, विजय चाळके, शामराव कोळेकर, छायाचित्रकार अनिल देसाई, कुमजाई पर्व चे संपादक प्रदीप माने, शंभूराज देसाई, व मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या सर्वांनी डाॅ.डाकवे यांची दूरदर्शनवर मुलाखत झालेबद्दल अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

लोकांनी मोठया प्रमाणात केलेल्या स्वागत आणि सत्कारामुळे आता काम करण्याची आणखी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे. तसेच समाजाप्रती काम करण्याची जबाबदारीही वाढल्याची भावनिक प्रतिक्रिया डाॅ.संदीप डाकवे यांनी दिली आहे.