चेंबूर परिसरातील खारदेवनगर चौकाच्या सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन संपन्न


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : चेंबूर आणि गोवंडीच्या सीमेवरील रस्त्याजवळ असलेल्या घाटले गाव भागातील खारदेवनगर चौकाच्या सुशोभीकरणाचे काम बेस्टचे माजी अध्यक्ष आणि चेंबूर वार्ड क्रमांक १५३ चे कार्यसम्राट नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या प्रयत्नातून होणार आहे. या सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन कार्यक्रम नुकताच स्थानिक नागरिकांच्या उपस्थित नुकताच पार पडला .

या कार्यक्रमप्रसंगी नगरसेवक अनिल पाटणकर यांच्यासह शिवसेनेचे चेंबूर विधानसभा संघटक अविनाश राणे, महिला उपविभाग संघटिका सुलभा पात्याने, शाखाप्रमुख उमेश करकेरा, महिला शाखा संघटीका अनिता महाडिक, समाजसेविका मिनाक्षी पाटणकर, कार्यालय प्रमुख मारूती वाघमारे, युवासेना मुंबई समन्वयक डाॅ अजित गावडे, युवती मुंबई समन्वयक श्रद्धा घाग, युवासेना शाखा अधिकारी विनय शेट्ये, शिवसेना - युवासेना महिला, पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.