श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये दोन दिवसाचे राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
घोगाव, तालुका-कराड येथील श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये दोन दिवसाचे ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रामध्ये डॉ एस. बी.भिसे यांनी प्रॅक्टिस स्कूल आणि प्रोजेक्ट वर्क चे फायदे सांगितले ज्यामध्ये विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करण्याचे फायदे व चालू जीवनातील आव्हानांना कसे तोंड द्यायचे यावर मार्गदर्शन केले. प्रा. अनंत एन.नाईक यांनी प्रोजेक्ट अहवाल योग्यरीत्या कसा बनवायचा यावर मार्गदर्शन केले संशोधनाचे महत्त्व आणि नवनवीन कल्पना बाबत माहिती सांगितली‌ डॉ. एस वासुदेव मूर्ती यांनी स्वतःचे अनुभव प्रॅक्टिस स्कूल मध्ये कसे मांडावे ते सांगितले प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी संशोधनाचे विषय कशा पद्धतीने निवडावे व ते कशा प्रकारे सादर करावे याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. ए. श्रीनाथ यांनी शोध निबंधाचा अहवाल वेगवेगळ्या पद्धतीने कसा तयार करावा जेणेकरून तो व्यवस्थितपणे कसा मांडावा याबद्दल मार्गदर्शन केले डॉ. कमलापुरकर यांनी पावर पॉइंट सादर करण्याचे महत्त्व व त्याचा उपयोग शोध निबंध सादर करताना कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता आटकेकर यांनी केले

 या कार्यक्रमाकरिता संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पाटील उपाध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, संस्थेच्या ट्रस्टी प्राजक्ता जोहरी व फार्मसीचे प्राचार्य डॉ. विजयानंद अरलेलीमठ, सर्व संचालक मंडळ यांनी मार्गदर्शन केले.