गोवा सरकारच्या लॉटरीत बनवाबनवी महाराष्ट्र लॉटरी विक्रेता संघटनेची तक्रार


मुंबई |कृष्णाकाठ वृत्तसेवा :

 गोवा राज्य सरकारच्या नावे महाराष्ट्रात विकल्या जाणाऱ्या लॉटरी तिकिटात खुलेआम बनवाबनवी असून या 'सेम टू सेम' फसवणुकीची गोवा सरकारने गंभीरपणे दखल घेऊन गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी अशी जोरदार मागणी महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता सेनेचे संस्थापक अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी केली आहे.

गोवा राज्याच्या लॉटरी संचालक श्रीमती सुषमा डी. कामत यांच्यासोबत लॉटरी विक्रेत्यांचे नेते विलास सातार्डेकर यांनी भेट घेऊन बनावट लॉटरीचा महाराष सुमारे दीड तास चाललेल्या या चर्चेत श्रीमती कामत यांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल व या कामी लॉटरी विक्रेता सेनेचे सहकार्य लाभेल अशी अपेक्षा व्यक्त केली. गोवा सरकारतर्फे दिवसभरात एक, महिन्याला एक आणि उत्सवातील सोडतींचा समावेश आहे. मर्यादित सोडती अधिकृत असूनही महाराष्ट्रात मात्र 'गोवा सरकार द्वारा प्रस्तुती' असे अगदी लहान अक्षरात छापून अनेक लॉटरींचा सुळसुळाट असल्याचा पर्दाफाश हा सातार्डेकर यांनी यावेळी पुराव्यासह केला. त्यावर संचालक श्रीमती कामत यांच्यासह सारे अधिकारी चक्रावूनच गेले. एकीकडे गोवा सरकारच्या लॉटरीला बदनाम करण्याचे हे षड्यंत्र असून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार त्यातून महाराष्ट्रात होत आहे.महाराष्ट्र राज्याचे लॉटरी आयुक्त तसेच मुंबई पोलीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या फसवणुकीच्या संदर्भात मुंबईत परतल्यानंतर रीतसर तक्रार करणार असून गोवा सरकारने आता अधिक दक्षता घेणे जरुरीचे आहे असेही सातार्डेकर म्हणाले.

यावेळी शिष्टमंडळात सुरेश म्हाडदळकर,सायमन बुथेलो,मोजेस परेरा,अंकुश कदम,राजाराम मडव आणि बाळू मेस्त्री यांचा समावेश होता.